राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ज्येष्ठ वकील उज्ज्वल देवराव निकम, सी. सदानंदन मस्ते, हर्षवर्धन श्रृंगला आणि मीनाक्षी जैन यांना राज्यसभेसाठी नामांकित केले आहे. उज्ज्वल निकम यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती, तर अन्य सदस्य सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यामुळे आता यानिमित्ताने उज्ज्वल निकम राज्यसभेचे खासदार होणार हे स्पष्ट झाले आहे.
चार सदस्य राज्यसभेसाठी नामांकित
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ज्येष्ठ वकील उज्ज्वल देवराव निकम, केरळमधील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ सी. सदानंदन मस्ते, माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला आणि प्रख्यात इतिहासकार आणि शिक्षणतज्ज्ञ मीनाक्षी जैन यांना राज्यसभेसाठी नामांकित केले आहे.
The President of India has nominated Ujjwal Deorao Nikam, a renowned public prosecutor known for handling high-profile criminal cases; C. Sadanandan Maste, a veteran social worker and educationist from Kerala; Harsh Vardhan Shringla, former Foreign Secretary of India; and… pic.twitter.com/eN6ga5CsPw
— ANI (@ANI) July 13, 2025
उज्ज्वल निकमांचे राज्यसभेत पुनर्वसन
उज्ज्वल देवराव निकम हे प्रसिद्ध वकिल आहेत. त्यांनी अनेक महत्त्वाच्या खटल्यांमध्ये सरकारचे प्रतिनिधित्व केले आहे. काही दिवसांपूर्वीच उज्वल निकम यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यांनी ही निवडणूक भाजपाकडून लढवली होती. उज्ज्वल निकम यांच्या नावाची आता घोषणा करण्यात आली असून ते राज्यसभेतून खासदार होणार आहेत.
प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम हे राज्यसभेतून खासदार होणार आहेत. दहशतवादी अजमल कसाबविरुद्धचा खटला लढवण्यासाठी ते ओळखले जातात. मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांच्या विरोधात उज्ज्वल निकम यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र पराभवाचा सामाना केल्यानंतर त्यांच्या राजकीय पुनर्वसनची गरज होती. या निमित्ताने उज्ज्वल निकमांचे राजकीय पुनर्वसन होणार असून ते आता राज्यसभेचे खासदार होतील, त्यांच्यासोबत देशातील इतर तीन मान्यवरांना देखील ही संधी मिळणार आहे. विविध क्षेत्रांत उत्तम कार्य केल्यानंतर ही संधी मिळत असते.






