राज्यात नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीत एमआयएमनं चांगलाच करिष्मा दाखवला. महाराष्ट्रात एमआयएमचे तब्बल 125 नगरसेवक निवडून आले आहेत. मुंबई महापालिकेतही एमआयएम तब्बल 8 जागांवर विजयी झाली. एकीकडे मनसे शरद पवार आणि अजित पवार गटाची मुंबईत दैना उडाली असताना दुसरीकडे ओबीसी यांचे आठ नगरसेवक निवडून आल्याने खळबळ उडाली. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी मुंबई महापालिकेत एमआयएमचे गटनेते म्हणून विजय तातोबा उबाळे यांच्या नावाची घोषणा केली आहे. यानंतर ओवेसी यांनी त्यांचे अभिनंदन करत पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
काय म्हणाले ओवेसीं
एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत गटनेता निवडीबाबत घोषणा केली. एमआयएमच्या नगरसेवकांनी गटनेते म्हणून विजय तातोबा उबाळे यांची निवड केल्याचं जलील यांनी सांगितलं. तर, प्रभाग समितीवर खैरुन्निसा आणि स्थायी समितीवर जमीर कुरेशी यांच्या नावाची घोषणा केली. जलील यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया देत ओवैसी यांनी सर्व नगरसेवकांचे आणि विजय उबाळे यांचे विशेष अभिनंदन केले.
विजय उबाळे यांच्या गोवंडी प्रभागातून विजय मिळवला आहे. या प्रभागाचा काही भाग विधानसभेला मानखुर्द शिवाजीनगर आणि अणूशक्तीनगर विधानसभा मतदारसंघात आहे. विजय उबाळे यांनी प्रभाग क्रमांक 140 मधील 16 उमेदवारांना पराभूत करून 4,945 मते मिळवली. या प्रभागात एकूण 25, 950 मते पडली, ज्यामध्ये उबाळे यांना 20% मते मिळाली. मुस्लिम बहुल भागात उबाळे यांना भरभरून मते मिळाली.
कोणत्या नगरपालिकेत MIM चे किती नगरसेवक
1. सोलापूर – 8
2. संभाजीनगर – 33
3. मालेगाव – 20
4. मुंबई – 8
5. नागपूर – 6
6. अहिल्यानगर – 2
7. जालना – 2
8. ठाणे – 5
9. नांदेड – 15
10. चंद्रपूर – 1
11. धुळे – 10
12. अकोला – 3
13. अमरावती – 12
एकूण – 125






