सावरकरांबाबत राहुल गांधी जे बोलले ते ऐतिहासिक सत्य, पोकळ धमक्यांना काँग्रेस भीक घालत नाही – हर्षवर्धन सपकाळ

Written by:Astha Sutar
Published:
एकट्या राहुल गांधींवर टीका करून त्यांना धमक्या देऊन काही साध्य होणार नाही, अशा धमक्यांना काँग्रेस पक्ष भीक घालत नाही, राहुल गांधी यांच्यासाठी काँग्रेसचा कार्यकर्ता भक्कमपणे उभा आहे.
सावरकरांबाबत राहुल गांधी जे बोलले ते ऐतिहासिक सत्य, पोकळ धमक्यांना काँग्रेस भीक घालत नाही – हर्षवर्धन सपकाळ

Harshvardhan Sapkal – राहुल गांधींनीव जे सावरकरांबाबत बोलले आहे, ते सत्य आहे. राहुल गांधी यांची आजी इंदिरा गांधी व वडील राजीव गांधी यांनी देशासाठी बलिदान दिले आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना धमक्या देण्यात आल्या आहेत, त्याचा आम्ही निषेध करतो. तसेच शहीद कुटुंबाचा वारसा असलेले राहुल गांधी अशा सोम्या गोम्यांच्या पोकळ धमक्यांना भीक घालत नाहीत.

राहुल गांधी यांना धमक्या देणाऱ्यांना काँग्रेसचा कार्यकर्ताच चोख उत्तर देईल, असा सणसणीत इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.

राहुल गांधींच्या मागे कार्यकर्ता भक्कमपणे उभा…

दरम्यान, एकट्या राहुल गांधींवर टीका करून त्यांना धमक्या देऊन काही साध्य होणार नाही, अशा धमक्यांना काँग्रेस पक्ष भीक घालत नाही, राहुल गांधी यांच्यासाठी काँग्रेसचा कार्यकर्ता भक्कमपणे उभा आहे. तसेच भारतीय जनता पक्षाचे नेते अरूण शौरी हे अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकारमध्ये मंत्री होते. त्यांनी सावरकर यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकात काय म्हटले आहे. तेही राहुल गांधींवर टिका करणाऱ्यांनी वाचावे, असा टोला सपकाळ यांनी लगावला.

इतिहासातील दाखले देऊन भूमिका मांडली…

राहुल गांधी हे सावरकर यांच्याबद्दल काहीही चुकीचे बोललेले नाहीत, अपशब्द वापरलेले नाहीत. इतिहासातील दाखले देऊन त्यांनी त्यांची भूमिका मांडली आहे. सावरकर यांच्याबद्ल जर समिक्षाच करायची असेल तर आतापर्यंत अनेक तज्ञ, इतिहासकार, विचारवंत यांनी सावरकर यांच्याबद्दल काय म्हटले आहे तेही पहावे. असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.