ZP Election Maharashtra : मोठी बातमी!! जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी या तारखेला मतदान

Published:
नगरपरिषद , नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.
ZP Election Maharashtra : मोठी बातमी!! जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी या तारखेला मतदान

ZP Election Maharashtra : नगरपरिषद , नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली आहे. त्यानुसार राज्यातील 12 जिल्ह्यात निवडणुकांचा धुरळा उडणार असून 12 जिल्हा परिषद (ZP Election) आणि 125 पंचायत समितींसाठी 5 फेब्रुवारीला मतदान आणि सात फेब्रुवारीला निवडणूक यांचा निकाल जाहीर होणार आहे. निवडणूक आयोगाच्या या घोषणेनंतर राज्यातील ग्रामीण भागात निवडणुकांचा धुरळा आता आणखी जोमाने पाहायला मिळेल.

 कोणकोणत्या जिल्ह्यात निवडणुका होणार? ZP Election Maharashtra

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, कोल्हापूर,  पुणे,  सातारा,  सांगली, छ. संभाजीनगर,  परभणी, धाराशिव,  कोल्हापूर जिल्ह्यात मतदान होईल.

महत्वाच्या तारखा

16 जानेवारी ते 21 जानेवारी – उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येईल
22 जानेवारी – अर्जाची छाननी
27 जानेवारी दुपारी 3.30 वाजेनंतर -उमेदवारी माघारीची अंतिम मुदत
यानंतर अंतिम यादी व चिन्ह वाटप
5 फेब्रुवारी – निवडणुकीसाठी मतदान
7 फेब्रुवारी – निकाल जाहीर होईल. ZP Election Maharashtra

दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण मर्यादा 50 टक्क्यांच्या वर गेलेल्या जिल्हा परिषदांची निवडणूक दुसऱ्या टप्प्यांमध्ये घेतली जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला 15 दिवसांची मुदतवाढ दिल्याने आता 15 फेब्रुवारीपर्यंत जिल्हा परिषदा आणि पंचायत समितींच्या निवडणुकांचा कार्यक्रम पूर्ण करणे निवडणूक आयोगाला बंधनकारक असणार आहे