ZP Election Maharashtra : महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने आज राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितींच्या निवडणुकांसाठी कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार 5 फेब्रुवारीला या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार असून 7 फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर होणार आहेत. ग्रामीण भागात खूप दिवसांनी निवडणुकांचा धुरळा उडणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी निवडणुकांची घोषणा करताच आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे उमेदवार या निवडणुकीत किती रुपयापर्यंत खर्च करू शकतो याची आकडेवारी ही निवडणूक आयोगाने जारी केली आहे.
किती रुपये खर्चाची मर्यादा (ZP Election Maharashtra)
निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार 71 ते 75 निवडणूक विभाग असलेल्या जिल्हा परिषदांसाठी 9 लाख आणि त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांसाठी 6 लाख रुपये खर्च मर्यादा असेल. तर, 61 ते 70 निवडणूक विभाग असेल्या जिल्हा परिषदांसाठी 7 लाख 50 हजार आणि त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांसाठी 5 लाख 25 हजार रुपये खर्च मर्यादा असेल. तसेच, 50 ते 60 निवडणूक विभाग असलेल्या जिल्हा परिषदांसाठी 6 लाख आणि त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांसाठी 4 लाख 50 हजार रुपये खर्च मर्यादा असणार आहे.
कोणकोणत्या जिल्ह्यात निवडणुका होणार?
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली, छ. संभाजीनगर, परभणी, धाराशिव, कोल्हापूर जिल्ह्यात मतदान होईल.
महत्वाच्या तारखा
16 जानेवारी ते 21 जानेवारी – उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येईल
22 जानेवारी – अर्जाची छाननी
27 जानेवारी दुपारी 3.30 वाजेनंतर -उमेदवारी माघारीची अंतिम मुदत
यानंतर अंतिम यादी व चिन्ह वाटप
5 फेब्रुवारी – निवडणुकीसाठी मतदान
7 फेब्रुवारी – निकाल जाहीर होईल. ZP Election Maharashtra
दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण मर्यादा 50 टक्क्यांच्या वर गेलेल्या जिल्हा परिषदांची निवडणूक दुसऱ्या टप्प्यांमध्ये घेतली जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला 15 दिवसांची मुदतवाढ दिल्याने आता 15 फेब्रुवारीपर्यंत जिल्हा परिषदा आणि पंचायत समितींच्या निवडणुकांचा कार्यक्रम पूर्ण करणे निवडणूक आयोगाला बंधनकारक असणार आहे






