Pune Grand Challenge Tour-2026 : पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व शाळांना पुढील आठवड्यात एक दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुड़ी यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. पुणे ग्रँड चॅलेंज टूर-२०२६ आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या अनुषंगाने आयोजित पहिल्या टप्प्याच्या दिवशी पिंपरी-चिंचवड शहरातील स्पर्धा मार्गावरील सर्व प्रकारच्या खाजगी आणि सरकारी शाळांना मंगळवार, २० जानेवारी २०२६ रोजी सुट्टी जाहीर करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डूडी यांनी जारी केले आहेत. पुण्यात होणाऱ्या सायकल स्पर्धेसाठी हे रस्ते बंद राहणार आहेत. नागरिकांनी पर्यायी मार्ग वापरण्याचं आवाहन पुणे वाहतूक पोलिसांकडून करण्यात आलं आहे.
19 ते २३ जानेवारीदरम्यान सायकल स्पर्धेचं आयोजन…
पुणे जिल्हा प्रशासन, बजाज तसेच सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने बजाज पुणे ग्रँड टूर-२०२६ युसीआय मान्यताप्राप्त आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा १९ ते २३ जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया व युनियन सायकलिस्ट इंटरनॅशनल यांनी निर्धारित केलेल्या आंतरराष्ट्रीय मानकानुसार आयोजित करण्यात येत आहे. ही स्पर्धा १९ जानेवारी रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ यावेळेत होईल. या स्पर्धेत जगभरातील ४० सायकलिस्ट सहभागी होणार आहेत. फर्ग्युसन कॉलेज रोड, गणेश खिंड रोड, जंगली महाराज रस्ता यावर ही स्पर्धा आयोजित होत आहे. त्यामुळे या कालावधीत हे तिन्ही रस्ते वाहतुकीसाठी पूर्णत: बंद करण्यात येत आहेत. या रस्त्यावर पार्किंग सुद्धा करता येणार नाही. लॉ कॉलेज रोडवरून बीएसीसी रोडवर यायचं असेल,भांडारकर रोडवर यायचं असेल, मॉडेल कॉलनीत येऊन तुम्हाला गाड्या पार्क करता येतील.तसच भोसले नगरमध्येही गाड्या पार्क करून स्पर्धा पाहण्यासाठी येऊ शकता.
स्पर्धेचा मार्ग कसा असेल?
२० जानेवारी रोजी या स्पर्धेचा पहिला टप्पा टि. सी.एल सर्कल हिंजवडी फेज-३ येथून सुरु होणार आहे. यानंतर सायकल स्पर्धेचा मार्ग पुढे- टी.सी.एस सर्कल-मेगापोलीस सर्कल सिंफोनी सोसायटी समोरुन उजवीकडे वळून- बापुजी बुवा मंदिर मार्गे पुणे ग्रामीण हद्दीत जाईल. पुढे परत डोणे फाटा येथून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत प्रवेश करुन पुढे रोहिदास मारुती सावळे चौक (डोणे फाटा) – डावीकडे वळून आढले बुद्रुक-बेबड ओहळ,- चांदखेड-कासारसाई-नेरे-मारुंजी-लक्ष्मी चौक-भुमकर चौक-अंडरपास मार्गे-डांगे चौक-अंडरपास मार्गे आदित्य बिर्ला हॉस्पिटल समोरुन रिव्हर व्ह्यू चौक वाल्हेकरवाडी-टि जंक्शन डावीकडेवळून छत्रपती शिवाजी महाराज चौक वाल्हेकरवाडी-डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक रावेत उजवीकडे वळून डॉ. डी. वाय पाटील कॉलेज आकुर्डी येथे समाप्त होणार आहे, असेही आदेशात नमूद केले आहे.





