Pune Metro : हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रोसाठी हिरवा कंदील; आयटी कर्मचाऱ्यांचा प्रवास होणार वेगवान

Published:
एकूण 23.33 किलोमीटर लांबीचा हा पूर्ण एलिव्हेटेड कॉरिडॉर असून, त्यात 23 उंची स्थानकांचा समावेश आहे. मेट्रोची रचना, स्टेशन सुविधांची तपासणी, सिग्नलिंग सिस्टिम, ब्रेकिंग टेस्ट आणि सुरक्षा मानकांशी संबंधित सर्व प्राथमिक चाचण्या पूर्ण झाल्याचे प्रकल्प अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
Pune Metro : हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रोसाठी हिरवा कंदील; आयटी कर्मचाऱ्यांचा प्रवास होणार वेगवान

Pune Metro : हिंजवडी आयटी पार्कसाठी अत्यंत महत्वाची मानली जाणारी हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाला आता प्रत्यक्षात गती मिळत असून, अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या तांत्रिक तपासण्या यशस्वीरीत्या पूर्ण होत आहेत. या मार्गाची दुसरी चाचणीही उत्तीर्ण झाली असून, मार्च ते एप्रिल 2026 या कालावधीत हा संपूर्ण मेट्रो मार्ग नागरिकांसाठी खुला होण्याची शक्यता अधिकच बळावली आहे.

सर्वात मोठ IT पार्क 

हिंजवडी आयटी पार्क हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे आणि देशातील दुसऱ्या क्रमांकाचे आयटी हब म्हणून ओळखले जाते. दररोज लाखो कर्मचारी या परिसरात कामानिमित्त ये-जा करतात. सकाळ-सायंकाळच्या वेळी मात्र वाहतूक कोंडी ही मोठी समस्या बनते. खासकरून शिवाजीनगर किंवा पुण्याच्या मध्यवर्ती भागात जाण्यासाठी 45 मिनिटांपासून तासाभरापर्यंत वेळ खर्ची पडतो. या पार्श्वभूमीवर मेट्रो मार्ग सुरू झाल्यानंतर वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होईल, असा अंदाज व्यक्त होत आहे.

किती आहे अंतर

एकूण 23.33 किलोमीटर लांबीचा हा पूर्ण एलिव्हेटेड कॉरिडॉर असून, त्यात 23 उंची स्थानकांचा समावेश आहे. मेट्रोची रचना, स्टेशन सुविधांची तपासणी, सिग्नलिंग सिस्टिम, ब्रेकिंग टेस्ट आणि सुरक्षा मानकांशी संबंधित सर्व प्राथमिक चाचण्या पूर्ण झाल्याचे प्रकल्प अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या मार्गाची सर्वात मोठी वैशिष्ट्ये म्हणजे हा कॉरिडॉर पुण्यातील दोन महत्त्वाच्या आयटी हबांना कमी वेळात जोडतो आणि वाहतूक ताण कमी करण्यास मदत करतो.

मेट्रो सुरू झाल्यानंतर हिंजवडी ते शिवाजीनगर हा प्रवास 20 ते 25 मिनिटांत पूर्ण होईल. सध्याच्या घडीला गर्दीच्या वेळी हा प्रवास 45 ते 60 मिनिटांच्या दरम्यान होतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा दररोज किमान तासभर वाचणार आहे. वेळेची बचत होऊन उत्पादकता वाढण्यासही ही मेट्रो मदत करेल, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

दरम्यान, सिव्हिल कोर्ट स्थानकावर या मेट्रो मार्गाला दोन विद्यमान लाईन्सशी इंटरचेंज मिळणार आहे. पीसीएमसी–स्वारगेट आणि वनाझ–रामवाडी या दोन्ही मार्गांशी जोडणी झाल्याने पुण्यातील मेट्रो कनेक्टिव्हिटी अधिकच मजबूत होईल. प्रवाशांना शहरातील विविध भागांत मेट्रोद्वारे सोयीस्कर प्रवास करता येणार आहे.

हिंजवडी आयटी पार्क परिसरात सध्या प्रदूषणाची समस्या देखील गंभीर होत चालली आहे. वाहनांची वाढती संख्या आणि वाहतूक कोंडी यात भर टाकतात. मेट्रो सेवा सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात वाहनांचा वापर कमी होईल आणि प्रदूषणातही घट अपेक्षित आहे. पर्यावरणपूरक प्रवास आणि वेळेची बचत या दोन्ही दृष्टिकोनातून ही सेवा पुणेकरांसाठी उपयुक्त ठरणार आहे.

प्रकल्पाशी संबंधित अधिकाऱ्यांच्या अंदाजानुसार, मेट्रो सुरू झाल्यानंतर दररोज दोन लाखांहून अधिक प्रवासी या मार्गाचा वापर करतील. सुरक्षित, वेगवान आणि आधुनिक प्रवासाचा अनुभव देणारा हा मार्ग पुण्यातील आयटी कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन जीवनात मोठा बदल घडवेल, असा तज्ज्ञांचा विश्वास आहे.

हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रो लवकरच सुरू झाल्यास पुण्यातील वाहतूक व्यवस्थेची दिशा बदलण्याची क्षमता या प्रकल्पात आहे. आयटी सेक्टर, विद्यार्थी, व्यावसायिक आणि सामान्य प्रवाशी—सर्वांसाठी हा मार्ग भविष्यातील प्रवासाचे नवे समीकरण ठरू शकतो.

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews