Pune News : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचा उत्साह पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्याच्या वाहतुकीत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. २१ जानेवारी, बुधवारीही पुण्यातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडण्यापूर्वी वाहतुकीतील बदल आणि पर्यायी मार्ग कोणते आहेत ते पाहून घ्यावे. पुणे शहरातून बुधवारी (२१ जानेवारी) होणाऱ्या दुसऱ्या टप्प्याच्या पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर वाहतूक मार्गात बदल करण्यात आला असून नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उप आयुक्त हिंमत जाधव यांनी केले आहे.
पुण्यातील वाहतूक मार्गात बदल…
ही स्पर्धा लेडीज क्लब, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक, गोळीबार मैदान चौक, शितल पेट्रोल पंप, खडी मशीन, ट्रिनिटी कॉलेज, बोपदेव घाट, खडकवासला, किरकीटवाडी, नांदेड सिटी या मार्गावर होणार आहे. त्याअनुषंगाने ब्ल्यू नाईल हॉटेल परिसर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक, खाण्या मारुती चौक ते सोलापूर बाजार चौकी, गोळीबार मैदार ते लुल्लानगर चौक, ज्योती हॉटेल चौक ते शितल पेट्रोल पंप, खडी मशीन चौक, येवलेवाडी ते बोपदेव घाट, खडकवासला ते सिंहगड रोड, किरकीटवाडी ते नांदेड सिटी, वारजे ब्रिज ते नांदेड सिटी हे मार्ग बंद राहतील.
पर्यायी मार्ग कोणते?
पर्यायी मार्ग: कोयाजी रोड, एम.जी. रोड, भैरोबा नाला, लुल्लानगर चौक, गंगाधाम चौकामार्गे, धोबीघाट चौक, डायसप्लॉट चौक व गिरीधरभवन चौकातून गोळीबार मैदान चौकाकडे येणारी वाहतूक बंद राहील. ही वाहतूक सेव्हन लव्हज चौक, वखार महामंडळ चौक, गंगाधाम चौ मार्गे जाईल. मंम्मादेवी चौक, भैरोबानाला, लुल्लानगर, गंगाधाम, सेव्हन लव्हज, शितल पेट्रोल पंप, कौसरबाग, गंगासेटेलाईट सोसायटी, नेताजीनगर लुल्लानगर मार्गे ब्रिजखालून जाईल. कान्हा हॉटेल, मिठानगर, आईमाता मंदीर, गंगाधाम चौक, लुल्लानगर, मंतरवाडी कडून येणाऱ्या वाहनांना कान्हा हॉटेल, गंगाधाम चौक, लुल्लानगर चौक, भैरोबानाला चौक, आश्रम रोड, एनआयबीएम रोड, गंगासेटेलाईट सोसायटी, नेताजी नगर लुल्लानगर मार्गे. श्रीराम चौक ते येवलेवाडी पर्यंत, धर्मावत पेट्रोलपंप ते येवलेवाडी, हडपसर-सासवड- बोपदेव घाट, कात्रज- शिंदेवाडी- बोपदेव घाट. खडकवासला ते किरकीटवाडी मार्गावर पानशेत मार्गे व किरकीटवाडी ते नांदेड सिटी मार्गावर एन.डी.ए.लिंक रोड व एन.डी.ए. शिवणे रोड मार्गे व डी.एस.के. विश्व, वडगाव धायरी या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असेही कळविण्यात आले आहे.





