Sun, Dec 28, 2025

Pune NCP : अजितदादांची ती मागणी शरद पवारांनी फेटाळली; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याला ब्रेक

Published:
शरद पवार गट आता महाविकास आघाडीच्या माध्यमातुन पुणे महापालिका निवडणूक लढवेल. त्यासंदर्भात काँग्रेस आणि ठाकरे गटाशी बोलणी सुरु आहे. काँग्रेस, ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या तिन्ही पक्षांची उशिरा रात्री संयुक्त बैठक झाली
Pune NCP : अजितदादांची ती मागणी शरद पवारांनी फेटाळली; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याला ब्रेक

Pune NCP : पुणे महापालिका निवडणुकीत शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणुका लढवतील अशा चर्चा मागील काही दिवसापासून सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूंच्या बड्या नेत्यांच्या बैठकाही पार पडल्या. शरद पवार अजित पवारांसोबत युती करतात हे पाहून प्रशांत जगताप यांनी पवार कटाला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीची युती जवळपास निश्चित मानली जात होती. मात्र आता अंतिम टप्प्यात ही युती फिस्कटली आहे. अजित पवारांनी शरद पवारांच्या उमेदवारांना घड्याळाचे नाव निवडणुका लढवण्याची अट घातली आणि काका पुतण्यांची संभाव्य युती तुटली. शरद पवार गटाचे नेते अंकुश काकडे यांनी याबाबत माहिती दिली आहे.

पवार गटाला अवघ्या ३५ जागा (Pune NCP)

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादीच्या आघाडीसाठी शरद पवार गटाचे नेते माजी महापौर अंकुश काकडे, माजी स्थायी समिती अध्यक्ष विशाल तांबे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बारामती होस्टेलवर शुक्रवारी रात्री भेट घेतली. त्यावेळी जागावाटप आणि कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवायची यावर चर्चा झाली. अजित पवारांनी शरद पवारा़ंच्या पक्षाला अवघ्या तीस ते पस्तीस जागा देऊ केल्यात आणि घड्याळ या चिन्हावर लढण्याची अट घातली असल्याची माहिती समोर आली आहे शरद पवार गटाने अजित पवारांचा हा प्रस्ताव फेटाळला आणि इथेच युतीची शक्यता संपुष्ठात आली . यानंतर दोन्ही राष्ट्रवादीची पुणे महापालिकेत आघाडी होणार नाही. आम्ही महाविकास आघाडीतून लढणार असल्याची माहिती अंकुश काकडे यांनी दिली.P une NCP

पवार गट महाविकास आघाडीसोबत लढणार –

शरद पवार गट आता महाविकास आघाडीच्या माध्यमातुन पुणे महापालिका निवडणूक लढवेल. त्यासंदर्भात काँग्रेस आणि ठाकरे गटाशी बोलणी सुरु आहे. काँग्रेस, ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या तिन्ही पक्षांची उशिरा रात्री संयुक्त बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे विशाल तांबे, अंकुश काकडे, मनाली भिलारे, अश्विनी कदम आणि आमदार बापू पठारे, तर काँग्रेसकडून अरविंद शिंदे, अभय छाजेड, रमेश बागवे आणि ठाकरेंच्या शिवसेनेते वसंत मोरे, गजानन थरकुडे, संजय मोरे हे उपस्थित होते.