MP Breaking News
Sat, Dec 20, 2025

Shani Dev : शनिवारी केलेल्या ‘या’ उपायांमुळे मिळेल; शनिदेवाची कृपा

Published:
शनिवार हा शनिदेवाला आणि हनुमानजींनाही समर्पित आहे. या दिवशी हनुमान मंदिरात जाऊन पूजा करणे अधिक फायदेशीर ठरते. शनिदेवाची पूजा करताना हनुमानाची पूजा केल्यास शनिदेवाचा प्रकोप कमी होतो आणि त्यांच्या कृपेचा वर्षाव होतो.
Shani Dev : शनिवारी केलेल्या ‘या’ उपायांमुळे मिळेल; शनिदेवाची कृपा

शनिवार हा न्याय देवता शनिदेवाला समर्पित दिवस मानला जातो. या दिवशी काही उपाय केल्याने शनि देव प्रसन्न होऊ शकतात. शनिदेवाची कृपा मिळाल्यावर कोणत्याही कामात अडथळा येत नाही. शनिवारी काही विशेष उपाय केल्याने शनिदेवाची कृपा प्राप्त होते. जाणून घेऊया शनिवारी करावयाचे उपाय…

हनुमान चालीसा पठण

शनिवारी हनुमान मंदिरात जाऊन हनुमान चालीसाचे पठण करणे अत्यंत फलदायी मानले जाते. याने शनिदोषाचा प्रभाव कमी होतो. शनिवार हा शनिदेवाचा दिवस असला तरी, हनुमानजींची पूजा केल्याने शनिदेवाच्या क्रोधापासून संरक्षण मिळते आणि त्यांच्या कृपेमुळे सर्व संकटे दूर होतात, असे मानले जाते. हनुमान चालीसाचा पाठ करा, कारण हनुमानाची पूजा केल्याने शनिदेवाचा अशुभ प्रभाव कमी होतो आणि त्यांची कृपा मिळते.

तेलाचा अभिषेक

हनुमानाला मोहरीचे तेल अर्पण करा आणि शनि मंदिरात जाऊन शनिदेवालाही तेल अर्पण करा. हा उपाय शनिदोषापासून मुक्ती देतो. शनिवारी शनि मंदिरात किंवा पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि शनिदेवाला मोहरीचे तेल व काळे तीळ अर्पण करा.

रूईचे फूल

शनिवारी शनिदेवाला रूईचे फूल अर्पण केल्याने साडेसातीचा त्रास कमी होतो आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात.  रूईचे फूल शनिदेवाला अतिशय प्रिय आहे. हे फुल अर्पण केल्याने शनिदेवाची कृपा होते आणि सर्व कामेही पूर्ण होतात.

दान करणे

शनिवारी शनिदेवाशी संबंधित वस्तूंचे दान केल्याने (जसे की काळे तीळ, लोखंड, काळे वस्त्र) शनिदेवाची कृपा प्राप्त होते. शनिवारी काळे तीळ किंवा काळे वस्त्र दान करणे शनिदेवाला प्रसन्न करते आणि साडेसातीतून मुक्ती देते.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)