दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी 14 जानेवारी रोजी मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे. नववर्षातील हा पहिला सण. हिवाळ्यामध्ये येणारा सण म्हणजे मकर संक्रांत. यामुळे या दिवसात गुळाचे आणि तिळाचे मोठ्या प्रमाणात सेवन केले जाते. मकर संक्रांतीला अनेक घरांमध्ये तिळगुळाचे लाडू तयार केले जातात. तिळगुळाचे लाडू तयार करताना योग्य पद्धत माहिती नसल्याने तिळगुळाचे लाडू बिघडतात. जाणून घेऊ तिळगुळाचे लाडू बनवण्याची योग्य पद्धत….
साहित्य
- तीळ
- शेंगदाणे
- गूळ
- तूप
- वेलची
- जायफळ पूड
कृती
- कढईत तीळ आणि शेंगदाणे मंद आचेवर वेगवेगळे भाजून घ्या. तीळ हलके भाजून पसरट भांड्यात काढून थंड करा. शेंगदाणे थंड झाल्यावर साल काढून घ्या.
- थंड झालेले तीळ आणि शेंगदाणे मिक्सरमध्ये जाडसर कूट (पावडर) करून घ्या
- एका मोठ्या भांड्यात तीळ-शेंगदाण्याचा कूट, किसलेला गूळ, वेलची-जायफळ पूड आणि गरम तूप घ्या. हे सर्व चांगले एकत्र करा. मिश्रण थोडे कोरडे वाटल्यास थोडे अधिक तूप घालू शकता.
- मिश्रण हाताळण्याइतके गरम असतानाच त्याचे छोटे किंवा मोठे लाडू वळायला सुरुवात करा. मिश्रण थंड झाल्यावर ते घट्ट होते आणि लाडू वळता येत नाहीत.
- या पद्धतीने तुम्ही घरीच मकरसंक्रांतीसाठी स्वादिष्ट आणि मऊ तिळाचे लाडू बनवू शकता आणि सणाचा आनंद घेऊ शकता.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)





