नाशिक जिल्हा न्यायालयाने मंगळवारी माणिकराव कोकाटे हे सदनिका घोटाळाप्रकरणी दोषी असल्याचा प्रथम वर्ग न्यायालयाचा निकाल कायम ठेवत त्यांची दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षाही कायम ठेवली होती. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांना आता क्रीडामंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. शिवाय, त्यांची आमदारकीही धोक्यात आल्याची माहिती समोर येत आहे. अशा परिस्थितीत कोकाटेंना आता मोठा धक्का बसला आहे. कारण, नाशिक न्यायालयाने मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले आहे. ३० वर्षांपूर्वीच्या गृहनिर्माण घोटाळा प्रकरणात त्यांना २ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली असून कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.
माणिकराव कोकाटेंना लवकरच अटक ?
राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. ३० वर्षांपूर्वीच्या एका गृहनिर्माण घोटाळा प्रकरणात नाशिक सत्र न्यायालयाने कोकाटे यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले आहे. याप्रकरणी न्यायालयाने शिक्षेची अंमलबजावणी तात्काळ करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आता त्यांचे मंत्रीपदही धोक्यात आले आहे.





