MP Breaking News
Thu, Dec 18, 2025

डांडरून=भरपूर, ८० नं = अत्यंत वेगानं; किऱ्यानिष्ट… नादच करायचा नाय, कोल्हापुरकरांचा स्वतंत्र शब्दकोष माहीत आहे का?

Published:
Last Updated:
कोल्हापुरी लोक फक्त भाषेच्या जोरावर परक्यांना आपलेसे करतात. ही भाषा रांगडी तर आहेच पण त्यासोबत ती प्रेमळसुद्धा आहे.
डांडरून=भरपूर, ८० नं = अत्यंत वेगानं; किऱ्यानिष्ट… नादच करायचा नाय, कोल्हापुरकरांचा स्वतंत्र शब्दकोष माहीत आहे का?

Swapnil Rajshekhar Kolhapuri language video:   महाराष्ट्र राज्यातील एक प्रमुख शहर म्हणजे कोल्हापूर होय. कोल्हापूर त्याच्या ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वासाठी ओळखले जाते. महालक्ष्मी देवीचे प्रसिद्ध मंदिर असल्याने या शहराला “दक्षिण काशी” असेही म्हणतात. कोल्हापूर त्याच्या अनोख्या खाद्यसंस्कृतीसाठी, विशेषतः कोल्हापुरी पाककृती आणि कोल्हापुरी चप्पलसाठी देखील प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे कोल्हापूर आपल्या रांगड्या भाषेसाठीदेखील प्रसिद्ध आहे.

कोल्हापूरमध्ये प्रत्येक व्यक्तीच्या तोंडात असे काही रांगडे शब्द असतात जे ऐकून अनेकांना आपुलकी वाटते. कोल्हापुरी लोक फक्त भाषेच्या जोरावर परक्यांना आपलेसे करतात. ही भाषा रांगडी तर आहेच पण त्यासोबत ती प्रेमळसुद्धा आहे.

कोल्हापुरी भाषेतील गोडवा जवळपास सर्वांनाच माहिती आहे. या भाषेची भुरळ फक्त सर्वसामान्य लोकांनाच नव्हे तर मोठ मोठ्या कलाकारांनादेखील पडते. अनेक सेलिब्रेटी विविध मालिकांमध्ये, चित्रपटांमध्ये किंवा खऱ्या आयुष्यातसुद्धा कोल्हापुरी भाषेचा वापर करत असतात. अभिनेता स्वप्नील राजशेखर तर मूळचा कोल्हापूरचा आहे. त्यामुळे त्याचं आपल्या रांगड्या भाषेवरील प्रेम सतत दिसून येतं.

 

अभिनेता स्वनिल राजशेखर कोल्हापुरी भाषेचा व्हिडीओ- 

 

अभिनेता स्वनिल राजशेखर सोशल मीडियावर विविध व्हिडीओ शेअर करत असतो. त्यामध्ये तो विविध कोल्हापुरी शब्द आणि त्यांचे अर्थ सांगत असतो. कोल्हापूरमध्ये इतके रांगडे शब्द आहेत कि त्यांची एक स्वतंत्र डिक्शनरी तयार होऊ शकते. चला पाहूया असेच काही शब्द आणि त्यांचे अर्थ…

 

कोल्हापुरी शब्द आणि त्यांचे अर्थ-

 

अष्टयात्तर- अट्ठ्याहत्तर

डांडरून- भरपूर

सप्पय सुभाष- अत्यंत भोळा, साधा व्यक्ती

८० नं- अत्यंत वेगाने

किऱ्यानिष्ट- तुसडा, चिडका, काड्या करणारा

ढालगा- प्रचंड मोठा, विशाल

वाडीचार- लांबड लावणे