MP Breaking News
Tue, Dec 16, 2025

E Pik Pahani : शेतकऱ्यांसाठी सरकारचा महत्वाचा निर्णय!! आता ऑफलाईन पद्धतीने करा ई पिक नोंदणी

नोंदणी न करू शकलेल्या शेतकऱ्यांसाठी ऑफलाइन पद्धतीने पीक नोंदणीची (E Pik Pahani) मुभा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जे शेतकरी 15 जानेवारीपर्यंत ऑफलाइन अर्ज सादर करतील त्या शेतकऱ्यांच्या कागदपत्रांची तपासणी पूर्ण झाल्यानंतर त्यांना शासकीय खरेदी केंद्रांवर शेतमाल विक्रीची परवानगी देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यांनी दिली
E Pik Pahani : शेतकऱ्यांसाठी सरकारचा महत्वाचा निर्णय!! आता ऑफलाईन पद्धतीने करा ई पिक नोंदणी

E Pik Pahani : ज्या शेतकऱ्यांनी अजूनही ई पिक नोंदणी केली नाही, अशा वंचित शेतकऱ्यांसाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. खरंतर सरकारने काही महिन्यापूर्वी ऑनलाइन पद्धतीने पीक नोंदणी करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले होते. परंतु अनेक शेतकऱ्यांना डिजिटल पद्धतीने ई पिक नोंदणी करणे शक्य झाले नाही. परिणामी बहुतेक शेतकरी या योजनेपासून वंचित राहिले. या शेतकऱ्यांसाठी आता ऑफलाईन पद्धतीने ई पीक नोंदणी करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. त्यासाठी मुदतही वाढवण्यात आली आहे.

कधी आहे शेवटची तारीख ? E Pik Pahani

सरकारकडून ऑनलाईन पद्धतीची ई पीक पाहणी प्रक्रिया 15 जानेवारीपर्यंत खुली ठेवण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य विधिमंडळ हिवाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात विक्रम पाचपुते यांनी ई पीक पाहणीबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. इ पीक पाहणी संदर्भात सरकार कडून अनेक वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे, मात्र असे असलं तरी प्रत्यक्षात ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी नोंदणी करताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे. काही शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन नाहीत, अनेक शेतकऱ्यांना डिजिटल पद्धतीने इ पीक नोंदणी कशी करायची ते माहित नाही. त्यामुळं या योजनेपासून अनेक शेतकरी वंचित राहिले आहेत. असे विक्रम पाचुपते यांनी म्हटलं.

यावर उत्तर देताना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं कि, नोंदणी न करू शकलेल्या शेतकऱ्यांसाठी ऑफलाइन पद्धतीने पीक नोंदणीची (E Pik Pahani) मुभा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जे शेतकरी 15 जानेवारीपर्यंत ऑफलाइन अर्ज सादर करतील त्या शेतकऱ्यांच्या कागदपत्रांची तपासणी पूर्ण झाल्यानंतर त्यांना शासकीय खरेदी केंद्रांवर शेतमाल विक्रीची परवानगी देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यांनी दिली.

ऑफलाईन पद्धतीने अशी करा ई पीक नोंदणी

ज्या शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने ई पीक नोंदणी करता आलेली नाही त्या शेतकऱ्यांना आता तलाठी कार्यालयात किंवा कृषी सहाय्यककडे जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. तलाठी किंवा कृषी सहाय्यक यांच्या मदतीने शेतकरी आपल्या शेतातील पिकांची अचूक माहिती नोंदवून घेऊ शकतील. या पद्धतीने शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी ऑफलाईन पद्धतीने पूर्ण होईल.