Dahi Handi Wishes Marathi 2025 : श्रीकृष्ण जन्माष्टमी आज रात्री १२:०४ ते १२:४७ या वेळेत ‘निषिता पूजा’चा शुभ मुहूर्त असून, मध्यरात्री १२:२६ हा भगवान कृष्णाचा जन्माचा क्षण मानला जातो. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवार, १६ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत, दहीहंडीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. जन्माष्टमी आणि दहीहंडीचे हिंदू धर्मियांमध्ये विशेष महत्व आहे, या सणांचा उत्साह महाराष्ट्रासह उत्तर भारतातील राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. मुंबई आणि उपनगरात तर लाखोंच्या दहिहंड्या पाहायला मिळतात. मानवी पिरॅमिड पाहण्यासाठीही या भागात मोठी गर्दी होते. दरम्यान या दिवशी आपल्या आप्तजनांना दहीहंडीच्या शुभेच्छा द्यायला विसरू नका.
दहीहंडीच्या मंगलमय शुभेच्छा…l Dahi Handi Wishes Marathi 2025
१ “दहीहंडीच्या निमित्ताने तुमच्या घरात सुख-समृद्धीचा आणि आनंद कायम भरलेला राहो — हार्दिक शुभेच्छा!”
२ “गोविंदा आला रे आला! तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला गोपाळकाला व दहीहंडीच्या मंगलमय शुभेच्छा.”
३ हातात घेऊनी बासरी आला कृष्ण थरावर थर रचून झाले मित्र सज्ज मटकी फोडू, खाऊ लोणी गोविंदा रे गोपाळा गाऊ गाणी दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा
४ फुलांचा हार पावसाची सर राधा-कृष्णाच्या प्रेमाला आली बहर साजरा करुया गोपालकाल्याचा सण! दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा!
५ हंडीवर आमचा डोळा, दह्या दुधाचा काला, मटकी फोडायला आला गोविंदा रे गोपाळा द
दहीहंडीच्या मन:पूर्वक शुभेच्छा
६ हाथी घोडा पालखी…जय कन्हैया लालकी
आयुष्यात सर्व यश तुमच्या वाट्याला येवो
आव्हांनामध्ये अधिक संधी मिळोत
दु:खापेक्षा जास्त आनंद मिळो
गोपाळकाल्याच्या हार्दिक शुभेच्छा
७ कृष्णाचं प्रेम,
कृष्णाची महिमा, कृष्णाची श्रद्धा,
कृष्णामुळे आहे संसार
तुम्हा सर्वांना दहीकाल्याच्या हार्दिक शुभेच्छा!
८ “लोण्यासाठी भांडणारा आणि गोपिकांना छेडणारा सगळ्यांचा रक्षणकर्ता आणि सर्वांचा प्रिय असा कन्हैया दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा
९ “भक्ती, उत्साह आणि प्रेम यांचं गोड संगम म्हणजे गोपाळकाला — तुमच्या आयुष्यातही हाच उत्सव नेहमी खुला राहो.”
दहीहंडीच्या मन:पूर्वक शुभेच्छा
१० चंदनाचा सुवास,
फुलांची बरसात,
दह्याची हंडी आणि पावसाची बरसात,
लोणी चोरायला आला माखनलाल,
दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा!





