How to control hunger: आपल्यापैकी बहुतेकांना भूक लागल्यावर काय खावे हे कळत नाही. लोक अनेकदा स्नॅक्स, बिस्किटे किंवा जंक फूड खाऊन त्यांची भूक भागवतात. परंतु हे पदार्थ भूक कमी करत नाहीत किंवा शरीराला पोषक तत्वे देत नाहीत, याउलट ते वजन आणि रक्तातील साखरेची पातळी वाढवतात.
जेव्हा तुम्हाला खूप भूक लागते तेव्हा तुम्ही असे पदार्थ खावेत जे तुमच्या शरीराची ऊर्जा वाढवतात आणि भूक नियंत्रित करतात. असे अनेक पदार्थ आहेत जे खाल्ल्याने भूक तर कमी होतेच पण महत्वाचं म्हणजे वजन वाढत नाही. हे पदार्थ नेमके कोणते आहेत त्याबाबत जाणून घेऊया……
भाजलेले चणे-
वजन कमी करताना किंवा नियमित भूक लागल्यावर भाजलेले चणे खा. पोषणतज्ञ सांगतात की भाजलेले चणे प्रथिने आणि फायबरने समृद्ध असतात. भाजलेले चणे खाल्ल्याने तुम्हाला बराच काळ पोट भरलेले राहण्यास मदत होते. लिंबू आणि काळे मीठ घालून भाजलेले चणे खाल्ल्याने चव दुप्पट होईल.आणि भूकसुद्धा कमी होईल.
सफरचंद-
जर तुम्हाला भूक लागली असेल आणि गोड पदार्था खाण्याची इच्छा असेल तर सफरचंद खा.त्यात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्ससारखे पोषक घटक असतात जे त्वरित ऊर्जा देतात. पचनाच्या समस्यांसाठी देखील सफरचंद खाणे फायदेशीर मानले जाते.
बदाम आणि अक्रोड-
बदाम आणि अक्रोड तुमची भूक लगेच भागवू शकतात. त्यामध्ये असलेले ओमेगा-३ फॅटी अॅसिड आणि प्रथिने मेंदूला सक्रिय ठेवतात आणि रक्तातील साखरेची पातळी संतुलित करतात. ते निरोगी चरबीने समृद्ध असतात आणि मेटाबॉलिज्मदेखील सुधारतात. परंतु दिवसातून ५-६ पेक्षा जास्त बदाम आणि २ पेक्षा जास्त अक्रोड खाऊ नका.
पॉपकॉर्न-
पॉपकॉर्न हा एक चविष्ट आणि आरोग्यदायी नाश्ता आहे. मक्यापासून बनलेल्या पॉपकॉर्नमध्ये कॅलरीज कमी आणि फायबर जास्त असते. बटर किंवा मीठ न घालता पॉपकॉर्न खाणे वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)





