What to eat if you feel weak during pregnancy: प्रेग्नेन्सीदरम्यान, महिलांची रोगप्रतिकारक शक्ती फारच कमकुवत होते.त्यामुळे त्यांना लहान-लहान कामे करूनही थकवा जाणवतो. प्रेग्नेन्सीदरम्यान थकवा येणे सामान्य आहे. कारण तुमचे शरीर नेहमीपेक्षा जास्त काम करत असते.
खरं तर प्रत्येक महिलेला प्रेग्नेन्सीदरम्यान थकवा जाणवतो. कारण ते एक सामान्य लक्षण आहे. प्रेग्नेन्सीदरम्यान थकवा हे एक सामान्य लक्षण आहे. परंतु काही पदार्थ खाऊन थकवा दूर करता येतो. आज आपण असे काही पदार्थ जाणून घेऊया जे प्रेग्नेन्सीमध्ये थकवा दूर करून इन्स्टंट एनर्जी देतात…..
पालक –
पालकमध्ये भरपूर प्रमाणात लोह असते. जे संपूर्ण शरीरात ऑक्सिजन वाहून नेण्यास मदत करते. लोहाच्या कमतरतेमुळेदेखील थकवा येऊ शकतो. एक कप उकडलेल्या पालकात ६.४ मिलीग्राम लोह असते. गर्भवती महिलांना दररोज २७ मिलीग्राम लोहाची आवश्यकता असते आणि पालक ही गरज पूर्ण करण्यास मदत करतो.
सफरचंद-
सफरचंदांमध्ये बोरॉनचे प्रमाण जास्त असते.जे नैसर्गिकरित्या ऊर्जा वाढवते. त्यात ग्लुकोज आणि फ्रुक्टोज सारखी नैसर्गिक साखरदेखील असते. जे रक्तातील साखर न वाढवता उर्जेची पातळी वाढवतात. सफरचंदांमध्ये फायबर देखील असते.जे रक्तातील साखर नियंत्रित करण्यास प्रभावी आहे.
रताळे-
मध्यम आकाराच्या रताळ्यामध्ये ०.८ मिलीग्राम लोह असते आणि त्यातील व्हिटॅमिन सी आणि तांबे देखील शरीराला लोह शोषण्यास मदत करतात. रताळ्यातील बीटा-कॅरोटीन शरीर व्हिटॅमिन ए शोषण्यासाठी वापरते. जे तुमच्या बाळाच्या डोळे, हाडे आणि त्वचेच्या विकासात मदत करते.
ड्रायफ्रूट्स-
दिवसभर ऊर्जा राहण्यासाठी तुम्ही ड्रायफ्रूट्स खाऊ शकता. नेहमी तुमच्यासोबत ड्रायफ्रुट्सची एक लहान टिफिन बॅग ठेवा. त्यात प्रथिने आणि फायबर असतात. जे तुम्हाला जास्त काळ पोट भरण्यास मदत करतात आणि तुम्हाला अनेक निरोगी फॅट्स आणि मॅग्नेशियम देखील प्रदान करतात.
भरपूर पाणी प्या-
थकवा दूर करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे हायड्रेटेड राहणे. पाणी हा रक्ताचा प्राथमिक घटक आहे आणि ते पेशींना आवश्यक पोषक तत्वांचा पुरवठा करते. जेव्हा शरीरात द्रवपदार्थांची कमतरता असते तेव्हा थकवा हा बहुतेकदा पहिला संकेत असतो. काही महिला गरोदरपणात सहा ते आठ ग्लास पाणी पितात. परंतु यावेळी त्यांना जास्त पाणी पिण्याची गरज असते. कारण त्यांच्या शरीरात अम्नीओटिक द्रव तयार होत असते. डिहायड्रेशनमुळे मूत्रमार्गात संसर्ग आणि अकाली प्रसूतीचा धोका देखील वाढू शकतो. पाण्याव्यतिरिक्त, तुम्ही लिंबूपाणी, नारळ पाणी आणि काकडीचा रस पिऊ शकता.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)





