Radish chutney Marathi recipe: हिवाळा सुरु होताच लोक मुळ्याचे पराठे, सॅलड आणि भाजी करून खायला सुरुवात करतात. कारण मुळा फक्त हिवाळ्यातच उपलब्ध असतो. त्यामुळे या काळात ते खाणे आवश्यक असते. ते खाण्यास चविष्ट तर आहेच, पण शरीरालादेखील अनेक फायदे देते. त्यामुळेच आज आपण आरोग्यासाठी फायदेशीर असणारी मुळ्याची चटणी कशी बनवायची ते जाणून घेऊया…..
मुळ्याची चटणी बनवण्यासाठी साहित्य-
मुळा – १
कोथिंबीर – १ वाटी
हिरव्या मिरच्या – १-२
मुळ्याची पाने – १/२ वाटी, चिरलेली(आवडीनुसार)
लसूण पाकळ्या – ४
मीठ – चवीनुसार
लिंबाचा रस – १ टेबलस्पून
पाणी – गरजेनुसार
मुळ्याची चटणी बनवण्याची रेसिपी-
-मुळ्याची चटणी बनवण्यासाठी, एक मुळा घ्या आणि पाण्याने चांगला स्वच्छ करा.नंतर कापून त्याचे लहान तुकडे करा.
आता मिक्सरच्या भांड्यात मुळ्याचे तुकडे घाला. मुळ्याची पानेसुद्धा चांगली धुवून घाला. त्यानंतर, लसूण पाकळ्या, चिरलेल्या मिरच्या, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडे पाणी घालून बारीक वाटून घ्या.
आता, एका भांड्यात चटणी काढा. त्यात चवीनुसार मीठ घाला. त्यानंतर, लिंबाचा रस घाला. अशा प्रकारे मुळ्याची चटणी तयार करा. हवी असल्यास तुम्ही कडीपत्ता, जिरे , मोहरीची फोडणीसुद्धा देऊ शकता.
रक्तदाब नियंत्रित ठेवते –
मुळा पोटॅशियमनेसमृद्ध असतो. तसेच शरीरात सोडियम-पोटॅशियमचे संतुलन राखून रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करू शकते. त्याच्या या गुणधर्मामुळे हिवाळ्यात प्रत्येकाने भरपूर मुळा खावा.
रोगप्रतिकारशक्ती वाढवते –
जीवनसत्त्वे अ, क, ई, बी६, पोटॅशियम आणि इतर खनिजांनी समृद्ध मुळा तुमची एकूण रोगप्रतिकारक शक्ती वाढवू शकतात. मुळा अँटीऑक्सिडंट्स आणि अँथोसायनिन्सने देखील समृद्ध असतात, म्हणजेच ते तुमच्या हृदयासाठी देखील चांगले असतात. अर्थात, दीर्घकालीन फायदे मिळवण्यासाठी, तुम्हाला ही भाजी नियमितपणे खावी लागेल.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)





