Ayurvedic tea for weight loss: आजकाल पुरुष असो वा महिला जवळपास सर्वच लोक नोकरी करत आहेत. त्यामुळे प्रत्येकाच्या लाइफस्टाइलमध्ये विविध बदल आले आहेत. शारीरिक हालचालींचा अभाव बदलेले खानपान यामुळे अनेकांना लठ्ठपणाचा सामना करावा लागत आहे. अनेकजण वजन कमी करण्यासाठी जिममध्ये मेहनत घेत आहेत. तर काहीलोक विविध औषधे घेत आहेत.
परंतु वजन कमी करण्यासाठी नैसर्गिक पद्धती अवलंबणे जास्त चांगले असते. यामुळे वजन तर कमी होतेच शिवाय कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. वजन कमी करण्यासाठी सर्वप्रथम दुधाचा चहा सोडणे आवश्यक आहे. त्याऐवजी तुम्ही तुमच्या दिनचर्येत आयुर्वेदिक चहाचा समावेश करा. यामुळे वजन कमी होण्यास फायदा होईलच. शिवाय तुमची त्वचा, केस सुंदर होतील. आणि शरीर आतून स्वच्छ होईल……
आल्याचा चहा-
आल्यामध्ये अँटी इन्फ्लीमेंट्री गुणधर्म असतात. त्यामुळे शरीरातील सूज कमी होण्यास मदत होते. बऱ्याचदा वाढलेले वजन हे इन्फ्लीमेशन असू शकते. त्यामुळे दररोज सकाळी आल्याचा चहा पिल्याने वजन कमी करण्यास फायदा होतो. तसेच आल्यामध्ये जिंजरोल घटक असतो जो पचनक्रिया सुधारण्यास मदत करतो.
पुदिन्याचा चहा-
पुदिन्याचा चहा पचनासाठी उत्तम असतो. त्याच्या सेवनाने पचनक्रिया सुधारते आणि पोटातील गॅसची समस्या दूर होते. शिवाय त्यातील गुणधर्म वजन कमी करण्यास मदत करतात. पुदिन्याचे अँटी ऑक्सीडेन्ट गुणधर्म कोलेस्ट्रॉल कमी करण्यासदेखील फायदेशीर आहेत.
तुळशीचा चहा-
तुळशीमध्ये अनेक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात जे शरीराला अनेक फायदे देतात. तसेच तुळशी मेटाबॉलिज्म वाढवून वजन कमी करण्यास मदत करते. हा चहा दररोज सेवन केल्याने नक्की फायदा मिळेल.
दालचिनीचा चहा-
दालचिनी आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. दालचिनीच्या सेवनाने रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत होते. तसेच त्यातील गुणधर्म मेटाबॉलिज्म वाढवतात. त्यामुळे शरीरातील चरबी जाळण्यास मदत होते. अशाने वजन नियंत्रित होते.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)





