Ayurvedic remedies for joint pain: हिवाळ्यात बहुतांश लोकांसाठी सांधेदुखी ही सर्वात मोठी समस्या बनते. थंड हवामान आणि कमी तापमानामुळे सांध्यातील हाडे आणि स्नायूंमध्ये कडकपणा आणि वेदना वाढतात. खासकरून गुडघे, कंबर आणि मनगटाच्या सांध्यावर या ऋतूत जास्त परिणाम होतो. हिवाळ्यात शरीरातील रक्ताभिसरण मंदावते, ज्यामुळे सांध्यापर्यंत पोहोचणारे पोषण आणि तेलकटपणा कमी होते.
थंड हवामानात स्नायूंची लवचिकता कमी होते. ज्यामुळे बसणे, उठणे, पायऱ्या चढणे किंवा चालणे यासारखी छोटी कामे देखील कठीण होतात. त्यामुळेच आज आपण सांधेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी काही घरगुती उपाय जाणून घेऊया…..
गरम तेलाने मालिश –
हिवाळ्यात कोमट तेलाने सांध्यांना मालिश केल्याने रक्तप्रवाह सुधारतो. मोहरी किंवा नारळाच्या तेलात थोडी हळद मिसळून मालिश करा. यामुळे स्नायूंना आराम मिळतो आणि वेदना कमी होतात. यामुळे सांध्यातील जळजळ आणि कडकपणा देखील कमी होतो.
आयुर्वेदिक उपाय-
आयुर्वेदात सांधेदुखीसाठी फायदेशीर असलेल्या अनेक औषधी वनस्पतींचे वर्णन केले आहे. अश्वगंधा, शिलाजित आणि गिलॉयचे सेवन केल्याने सांधेदुखी कमी होऊ शकते. याव्यतिरिक्त, तुमच्या आहारात लसूण, ओवा आणि मेथीच्या दाण्यांचा समावेश केल्याने सांधेदुखी आणि सूज कमी होऊ शकते.
हळद आणि आले-
हळद आणि आल्याचे सेवन सांधेदुखी कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. आले आणि हळदीमध्ये चांगले अँटी इन्फ्लीमेंट्री गुणधर्म असतात. आले पाण्यात थोडा वेळ उकळवा आणि नंतर ते थंड झाल्यावर प्या. अर्धा चमचा हळद एका ग्लास कोमट दुधात मिसळून दररोज रात्री झोपण्यापूर्वी प्यायल्याने सांधेदुखीपासून आराम मिळतो.
तीळ-
तीळ हे हिवाळ्यातील सर्वात फायदेशीर पदार्थांपैकी एक मानले जाते आणि आयुर्वेदात त्याला सांध्यासाठी सुपरफूड असेही म्हटले जाते. त्यात कॅल्शियम, तांबे, मॅग्नेशियम आणि हेल्दी फॅट्स भरपूर असतात. जे सांध्यांसाठी वंगण म्हणून काम करतात आणि हाडे मजबूत करतात. जर तुम्हाला तीळ खायचे असेल तर सकाळी रिकाम्या पोटी एक चमचा भाजलेले तीळ किंवा तिळाचे लाडू खाण्याची सवय करा. ते हाडांसाठी खूप फायदेशीर आहे.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)





