Mumbai To Bangalore Express Train : पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. खरं तर सुजलाम सुफलाम असलेल्या या प्रदेशात कसलीही अडचण निर्माण झाली नाही. पश्चिम महाराष्ट्रात वाहतुकीची व्यवस्थाही चांगली आहे. रस्ते वाहतूक, रेल्वे वाहतूक, विमान वाहतुकीत पश्चिम महाराष्ट्र आघाडीवर आहे. आता पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी लवकरच एक नवीन एक्सप्रेस ट्रेन सुरु होणार आहे. मुंबई ते बंगळुरू अशा या एक्सप्रेस ट्रेनचे नाव असून नवीन वर्षात ती प्रवाशांच्या सेवेत येईल. केंद्रीय रेल्वे विभागाने या एक्सप्रेस ट्रेनला मंजुरी दिली आहे. या ट्रेनचे वेळापत्रक आणि ती कोणकोणत्या रेल्वे स्टेशनवर थांबेल याबाबत आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
१७ डब्ब्यांची ही एक्स्प्रेस ट्रेन –
मुंबई ते बंगळुरू रेल्वे आठवड्यात दोन दिवस धावणार असून, आधुनिक एलएचबी प्रकारच्या १७ डब्ब्यांची ही एक्स्प्रेस नववर्षातच सुरू होण्याची होणार आहे. बंगळुरू मधील आयटी आणि उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या तसेच पुणे-मुंबईमध्ये शिक्षण व नोकरी करणाऱ्या प्रवाशांसाठी रात्री सुटणारी ही गाडी अत्यंत उपयुक्त असणार आहे. या नव्या रेल्वेगाडीमुळे पश्चिम महाराष्ट्रातील जे तरुण मुंबई- पुण्यात कामाला किंवा शिक्षणासाठी आहेत त्यांनाही मोठा फायदा होईल. त्यांच्या येण्याजाण्याचा प्रश्न मिटेल. Mumbai Bangalore Express Train
कसे आहे वेळापत्रक – Mumbai Bangalore Express Train
मुंबई ते बंगळुरू ही ट्रेन लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून रविवारी आणि बुधवारी रात्री आठ वाजून 35 मिनिटांनी सुटेल. तर शनिवारी आणि मंगळवारी रात्री साडे दहा वाजता बेंगलोर स्थानकावरून सोडली जाणार आहे. या नव्या एक्सप्रेस ट्रेनला दावणगेरे, हुबळी, धारवाड, बेळगावी, मिरज, सांगली, कराड, सातारा, लोणंद, पुणे, लोणावळा, कर्जत, कल्याण व ठाणे या महत्त्वाच्या स्टेशनवर रेल्वे मंत्रालयाकडून थांबे मंजूर करण्यात आले आहेत. हुबळी, मिरज आणि पुणे येथे या गाडीत पाणी भरण्यात येणार असून, मुंबई आणि बंगळुरू येथे यांना दुरुस्ती व देखभाल केली जाईल.





