उद्या ८ ऑगस्ट रोजी राज्यभरात नारळी पौर्णिमेचा सण साजरा केला जाणार आहे. कोळी बांधवांसाठी हा सण अत्यंत महत्त्वाच्या असतो. या दिवशी कोळी बांधव समुद्राची विधीवत पूजा करतात. तसेच समुद्राला नारळ अर्पण करुन प्रार्थना देखील करतात. दरम्यान राज्य सरकारकडून उद्या शाळा, कॉलेजांना सु्ट्टी जाहीर करण्यात आली आहे. याशिवाय आणखी एक महत्त्वाची बातमी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेतील अत्यावश्यक सेवा वगळता इतर कार्यालयांना उद्या ८ ऑगस्ट २०२५ रोजी नारळी पौर्णिमेनिमित्त सुटी जाहीर करण्यात आली आहे.
अत्यावश्यक सेवा वगळता इतर कार्यालयांना उद्या सुट्टी…
नारळी पौर्णिमा सणानिमित्त महाराष्ट्र शासनाने उद्या, शुक्रवार दिनांक ८ ऑगस्ट २०२५ रोजी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील राज्य शासकीय / निमशासकीय कार्यालयांना सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. यास अनुसरून, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अत्यावश्यक सेवा वगळता इतर कार्यालयांना देखील उद्या शुक्रवार ८ ऑगस्ट २०२५ रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर महानगरपालिका कार्यालये, शाळा इत्यादी बंद राहतील.
शाळा, कॉलेजांनाही उद्या सुट्टी
राज्य सरकारने मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यांसाठी सन 2025 च्या स्थानिक सुट्ट्यांबाबत एक महत्त्वाचं पत्रक जारी केले आहे. यानुसार, गोपाळकाला (दहीहंडी) आणि अनंत चतुर्दशी या दिवसांची सुट्टी रद्द करून त्याऐवजी नारळी पौर्णिमा आणि ज्येष्ठगौरी विसर्जन या दोन दिवसांसाठी स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हे आदेश मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना लागू असतील असे महाराष्ट्र शासनाने जाहीर केले आहे. यामुळे मुंबईसह महाराष्ट्रातील शाळा आणि कॉलेजनाही शुक्रवारी सुट्टी मिळणार आहे.





