Maharashtra Politics : मुंबई महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती निश्चित मानली जात असताना दुसरीकडे काँग्रेसकडून मुंबई महापालिकेत वेगळी वाट निवडीची चाचपणी सुरू करण्यात आली आहे. राज ठाकरेंमुळे काँग्रेसने महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि स्वबळाचा नारा दिला. मात्र आता काँग्रेसकडून प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी सोबत युती करण्याबाबत हालचाली वाढले आहेत.
काय आहे यामागच राजकारण? Maharashtra Politics
काँग्रेसने प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीबरोबर हातमिळवणीची तयारी सुरू केल्याचे दिसते. काँग्रेसच्या शिष्टमंडळाने प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आहे. ठाकरे बंधूंना सोडून वंचित बहुजन आघाडी सोबत निवडणूक लढवण्यामागे काँग्रेसचे राजकारण सुद्धा तितकच मोठ आहे. मुंबईत अनुसूचित जाती प्रवर्गातील ४९ जागा आहेत. याठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा फायदा काँग्रेसला होऊ शकतो असं मानले जात आहे. त्याचमुळे काँग्रेस वंचित आघाडीसोबत युती करण्यासाठी इच्छुक असल्याचे बोललं जात आहे. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती झाल्यास महाराष्ट्राच्या राजकारणातील (Maharashtra Politics) हि नवीन युती असेल.
शरद पवार काय करणार?
दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती जवळपास निश्चित मानली जातेय. कधीही त्यांच्या युतीची घोषणा होऊ शकते. काही दिवसांपूर्वीच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांची थेट सिल्वर ओकवर जाऊन भेट घेतली होती. या भेटीनंतर शरद पवार मुंबईत ठाकरे गटासोबत निवडणूक लढवतील असं बोललं जात आहे. मात्र याबाबत कोणतीही अंतिम घोषणा त्यांच्या पक्षाकडून करण्यात आलेली नाही. परंतु शक्यतो शरद पवार हे मुंबईत ठाकरे बंधूना साथ देतील अशी शक्यता वर्तवण्यात येतेय.





