Sat, Dec 27, 2025

Vaibhav Suryawanshi Award: वैभव सुर्यवंशीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान

Written by:Rohit Shinde
Published:
केवळ 14 वर्षांचा वैभवने क्रिकेट जगतात धुमाकूळ घातला आहे आणि अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. क्रिकेटच्या मैदानावरील त्याच्या उल्लेखनीय यशामुळे त्याला आता विशेष सन्मानाने गौरवण्यात आले आहे. भारत सरकारकडून वैभवला खास पुरस्कार मिळाला आहे.
Vaibhav Suryawanshi Award: वैभव सुर्यवंशीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान

वैभव सूर्यवंशीला देशातील सर्वोच्च बाल पुरस्कार, Pradhan Mantri Rashtriya Bal Puraskar सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एका विशेष समारंभात बिहारच्या युवा क्रिकेटपटूला पुरस्कार प्रदान केला. शुक्रवार, 26 डिसेंबर रोजी, जेव्हा बिहार संघ विजय हजारे ट्रॉफीमधील दुसऱ्या सामन्यासाठी मैदानावर होता, तेव्हा संघाचा सुपरस्टार फलंदाज वैभव सूर्यवंशी नवी दिल्लीतील विज्ञान भवनात उपस्थित होता. त्याठिकाणी वैभवला हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

क्रिकेटपटू वैभव सुर्यवंशीचा मोठा गौरव

१४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने आपल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर क्रिकेट विश्वात आपल्या नावाचा डंका वाजवला. टी-२० क्रिकेटमध्येही त्याने लहान वयातच शतकांचा पाऊस पाडत विश्वविक्रम नावे केला आहे. २०२५-२६ च्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात वैभव सूर्यवंशीने बिहारसाठी १०९ धावांची वादळी खेळी केली आणि त्याच्या लिस्ट ए कारकिर्दीतील पहिलं शतक झळकावण्यात तो यशस्वी झाला. यानंतर आता त्याला राष्ट्रपतींकडून खास पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. आहे.

वैभवने अरुणाचल प्रदेशविरुद्ध विजय हजारे ट्रॉफीमधील सामन्यात ८४ चेंडूत १५ षटकार आणि १६ चौकारांसह १९० धावा केल्या आणि त्याचा स्ट्राईक रेट २२६.१९ होता. यासह बिहार संघाने लिस्ट ए क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या उभारत वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. यानंतर त्याला आता दिल्लीत खास पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं, त्यामुळे तो दुसऱ्या फेरीतील सामन्याला मुकला आहे.

चमकदार कामगिरीमुळे वैभव चर्चेत

बिहारमधील समस्तीपूर येथील रहिवासी असलेल्या वैभवला क्रिकेट जगतात त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल हा पुरस्कार देण्यात आला. आयपीएलमधील सर्वात तरुण खेळाडू आणि सर्वात जलद शतक करणारा भारतीय फलंदाज होण्याच्या कामगिरीबद्दल राष्ट्रपती मुर्मू यांनी त्याला हा पुरस्कार प्रदान केला. पुरस्कारासाठी वैभवचे नाव घेताच, विज्ञान भवनात टाळ्यांचा कडकडाट झाला. हा पुरस्कार क्रीडा, कला, संस्कृती, शौर्य किंवा विज्ञान यासारख्या क्षेत्रात अपवादात्मक कामगिरी करणाऱ्या 5 ते 18 वयोगटातील मुलांना दिला जातो. यावर्षीच्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये वैभवने आपल्या फलंदाजीने खळबळ उडवून दिली. अरुणाचल प्रदेशविरुद्धच्या सामन्यात त्याने स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी 190 धावांची वादळी खेळी करत विक्रमी शतक झळकावले आणि अनेक विक्रम रचले.