Dhananjay Munde : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांची सदनिका घोटाळा प्रकरणातील शिक्षा सत्र न्यायालयानं कायम ठेवल्यानं कोकाटे यांचे मंत्रीपद धोक्यात आला आहे. माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा सरकारकडून केव्हाही घेतला जाऊ शकतो. एकीकडे माणिकराव कोकाटे यांचे मंत्रीपद जातेय अशी शक्यता निर्माण झाली असताना दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. मुंडे शहा यांच्या भेटीमुळे राज्य मंत्रिमंडळातून माणिकराव कोकाटे आऊट आणि धनंजय मुंडे इन होतायत का? अशा चर्चा सुरू झाल्या. याबाबत शरद पवार गटाचे बीडचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांना विचारलं असता त्यांनी आपल्या खास शैलीत धनंजय मुंडेना टोला लगावला आहे.
काय म्हणाले बजरंग बाप्पा?? Dhananjay Munde
धनंजय मंडे मंत्री होणारच नाहीत, जर तर वर मी बोलणार नाही. मी जबाबदारीने सांगतोय. आता ते महाराष्ट्राच्या, दिल्लीच्या मंत्रिमंडळात पुन्हा दिसणार नाही. त्यांना मंत्री व्हायचं असेल तर अमेरिकेला जावं लागेल अशा शब्दात बजरंग बाप्पा सोनावणे यांनी धनंजय मुंडे यांना डिवचले. 2 गोष्टी पक्क्या आहेत, वाल्मिक कराडला जामीन मिळणार नाही आणि धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळणार नाही, असं बजरंग बाप्पा सोनवणे यांनी म्हटल. Dhananjay Munde
वाल्मीक कराडचा जामीन कोर्टाने फेटाळला
दरम्यान, सरपंच संतोष देशमुख खून खटल्यातील मुख्य आरोपी असलेल्या वाल्मीक कराडचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळला आहे.संतोष देशमुख खून खटल्यात बीडच्या सत्र न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर वाल्मीक कराडने औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. मात्र न्यायमूर्ती सुशील घोडेस्वार यांनी वाल्मीक कराड चा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे वाल्मीक कराडचा पाय आणखी खोलात गेला आहे.





