Ladki Bahin Yojana : 2024 च्या निवडणुकीच्या प्रचारांदरम्यान पुन्हा एकदा आमचे सरकार निवडून दिल्यास आम्ही लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपये देऊ अशी घोषणा महायुती सरकारने केली होती . मात्र सरकार येऊन वर्ष उलटलं तरी लाडक्या बहिणींना 2100 रुपये काय मिळालेच नाहीत. मात्र आता महापालिका निवडणुकीतील प्रचंड यशानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणीसाठी मोठी घोषणा केली आहे. आम्ही लवकरच लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
काय म्हणाले एकनाथ शिंदे (Ladki Bahin Yojana)
प्रसारमाध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, शिवसेनेच्या आजपर्यंतच्या इतिहासात एवढे नगराध्यक्ष निवडून आले नव्हते. यासाठी सर्व कार्यकर्त्यांचे आणि लाडक्या बहिणींचे अभिनंदन. लाडकी बहीण योजना, लेक लाडकी लखपती योजना, मुलींना उच्च शिक्षण मोफत, आरोग्याबाबत अनेक योजना राबवल्या याचा मला आनंद आणि समाधान आहे. (Ladki Bahin Yojana)
लाडक्या बहिणींना 2100 देणार
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हि माझी आवडती योजना आहे. या योजनेला अनेकांनी विरोध केला होता, मात्र तो विरोध मोडून काढत आम्ही हि योजना सुरु ठेवली. इथून पुढेही हि योजना सुरूच राहणार आहे. कोणीही माय का लाल ही योजना (Ladki Bahin Yojana) बंद करू शकत नाही. तसेच आम्ही लाडक्या बहिणींना २१०० रुपये देणार म्हणजे देणार. योग्य वेळी आल्यावर आम्ही लाडक्या बहिणींच्या सन्मान निधीत वाढ करू अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली





