हजारो मराठा बांधवांना सोबत घेत मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने कूच केले आहे. ओबीसी कोट्यातून समाजाला आरक्षण मिळावे, ही जरांगेंची मागणी आहे. मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा आंदोलन करत सरकारला घाम फोडला आहे. ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण द्या, या मागणीवर जरांगे ठाम आहेत. जरांगेंना समाजाचा पाठिंबा रात्रीत मिळाला नसून त्यामागे कित्येक वर्षांचा संघर्ष आहे. अनेक वर्षे जरांगेंनी पडद्याच्या पलीकडे राहून समाजासाठी अविरत कार्य केले आहे, जरांगेंचा थक्क करणारा जीवन प्रवास थोडक्यात जाणून घेऊ…
मनोज जरांगेंच्या प्रारंभीचे आणि व्यक्तिगत जीवन
मनोज रावसाहेब जरांगे पाटील यांचा जन्म 01 ऑगस्ट 1982 रोजी बीड जिल्ह्यातील मातोरी गावात झाला. कुणबी-मराठा समाजात त्यांच्या जन्म झाला. मनोज जरांगे हे मूळचे महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील आहेत. मात्र सुमारे 20 वर्षांपूर्वी दुष्काळामुळे त्यांचे वडील जालना जिल्ह्यात स्थायिक झाले होते. मनोज जरांगे हे 4 भावंडांमध्ये सर्वात लहान आहेत. वैयक्तिक जीवनात मनोज जरांगे यांचे लग्न सुमित्रा जरांगे यांच्याशी झाले आहे, त्यांना एक मुलगा व तीन मुली आहेत. मनोज जरांगे हे 4 भावंडांमध्ये सर्वात लहान आहेत. ते मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गेल्या काही वर्षांपासून आंदोलने करत आहेत. बारावीत असताना त्यांनी शिक्षण सोडले. त्यानंतर ते आरक्षणाच्या चळवळीत सामील झाले. उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी अंबडमध्ये हॉटेलमध्येही काम केले होते. मनोज जरांगे यांनी आतापर्यंत 30 पेक्षा अधिक वेळा आंदोलन केले आहे.
2 एकर विकली, पण समाजासाठी लढा दिला!
मनोज जरांगे पाटील हे सुरुवातीला काँग्रेसचे कार्यकर्ते होते. ते काही काळ जालना जिल्ह्यातील युवक काँग्रेसचे अध्यक्षही होते. मात्र वैचारिक मतभेद असल्यामुळे त्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि ते राजकारणातून बाहेर पडले. कालांतराने त्यांनी मराठा समाजाच्या सक्षमीकरणासाठी शिवबा संघटनेची स्थापना केली. या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी मराठा समाजाचे प्रश्न सोडविण्याचे काम केले. संघटना चालवण्यासाठी पैसे नव्हते, त्यामुळे त्यांनी आपली जमीन विकली होती अशीही माहिती आहे.
विखुरलेला मराठा समाज एकसंध जोडला!
मनोज जरांगे पाटील हे सुरुवातीला काँग्रेसचे कार्यकर्ते होते. ते काही काळ जालना जिल्ह्यातील युवक काँग्रेसचे अध्यक्षही होते. पुढे काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर जरांगेंनी शिवबा संघटनेची स्थापना केली. 2016 ते 2018 पर्यंत त्यांनी जालन्यात आरक्षण चळवळीचे नेतृत्वही केले होते. जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली 2021 मध्ये जालन्यातील पिंपळगाव येथे मराठा आरक्षणासाठी तीन महिने आंदोलन करण्यात आले होते, त्यानंतर 2023 मध्येही त्यांनी आंदोलन केले होते. 2023 मधील आंदोलनाची अवघ्या जगाने दखल घेतली होती. त्यावेळी सरकारने दिलेला शब्द पाळला नसल्याचे जरांगेंचे मत आहे. ते आता पुन्हा एकदा आरक्षणाच्या आंदोलनासाठी मुंबईकडे निघाले आहेत. यावेळीही त्यांच्यासोबत हजारोंच्या संख्येने मराठा बांधव आहेत. त्यामुळे जरांगेंच्या लढ्याला यावेळी यश येते का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.





