Pune New Bus Stand : पुणेकरांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. पुणे जिल्ह्याला लवकरच एक नवीन बस स्थानक मिळणार आहे. हे बस स्थानक दौंड येथे उभारण्यात येणार असून यासाठी सात कोटींची मंजुरी मिळाल्याचे बोलणे जाते. या नवीन बसस्थानकामुळे दौंड आणि आसपासच्या परिसरातील प्रवाशांना मोठा फायदा होईल.
राहुल कुल यांचा पाठपुरावा (Pune New Bus Stand)
दौंड चे आमदार राहुल कुल यांनी नवीन बसस्थानकाच्या नूतनीकरण साठी मागील काही दिवसांपासून सातत्याने पाठपुरावटा केला होता अखेर त्यांच्या या मागणीला यश आलेल आहे. राहुल कुल यांच्या पाठपुराव्यामुळे राज्य शासनाच्या परिवहन व गृह विभागाने या प्रकल्पासाठी सात कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून या प्रस्तावाला नुकताच ग्रीन सिग्नल मिळाला आहे. (Pune New Bus Stand)
हा प्रस्ताव मंजूर झाला असल्याने आता दौंड शहरातील बस स्थानक आणि एसटी आगाराचे नूतनीकरण शक्य होणार आहे. सध्य स्थितीला दौंड बस स्थानकाची अवस्था फारच दयनीय झाली आहे. प्रवासी आहे कर्मचाऱ्यांनाही याची मोठी अडचण होते. ही अडचण पाहूनच आमदार राहुल कुल यांनी या बस स्थानकाच्या कामासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू केला होता.
बसस्थानकात कोणकोणती कामे केली जाणार?
या निधीमधून मुख्य आगाराची इमारत पूर्णपणे दुरुस्त केली जाणार आहे. तसेच चालक व वाहकांसाठी टॉयलेट तयार केले जाणार आहे. नवं विश्रांतीगृह उभारले जाईल. महिला कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र विश्रांती गृह तयार होणार आहे.





