Marathi News
Sun, Jan 11, 2026

Rohit Pawar : अजितदादा म्हणजे KGF मधील रॉकीभाई- रोहित पवार; पुण्यात काका -पुतण्याने मैदान गाजवलं

Published:
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज दोन्ही राष्ट्रवादीची एकत्रित सभा झाली. महत्त्वाची बाब म्हणजे राष्ट्रवादी फुटीनंतर प्रथमच अजित पवार आणि रोहित पवार एकाच मंचावर पाहायला मिळाले
Rohit Pawar : अजितदादा म्हणजे KGF मधील रॉकीभाई- रोहित पवार; पुण्यात काका -पुतण्याने मैदान गाजवलं

Rohit Pawar : अजितदादा म्हणजे KGF मधील रॉकीभाई आहेत असे म्हणत रोहित पवार यांनी अजित पवारांचे कौतुक करत भाजपला स्पष्ट इशारा दिला आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज दोन्ही राष्ट्रवादीची एकत्रित सभा झाली. महत्त्वाची बाब म्हणजे राष्ट्रवादी फुटीनंतर प्रथमच अजित पवार आणि रोहित पवार एकाच मंचावर पाहायला मिळाले. काका पुतण्यांनी शेलक्या शब्दात भाजपचे स्थानिक आमदार महेश लांडगे यांच्यावर नाव न घेता टीका केली आणि मैदान गाजवले.

काय म्हणाले रोहित पवार (Rohit Pawar)

पिंपरी – चिंचवडमधील सांगवी येथे झालेल्या प्रचार सभेत बोलताना रोहित पवार म्हणाले की, पिंपरी-चिंचवडमध्ये स्थानिक नेत्यांनी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला आहे. भाजपला सत्तेबाहेर काढण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आले आहेत. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन, त्यांच्या आग्रहामुळेच आम्ही एकत्र आलो आहोत. भाजपने पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळे गुंडगिरी आणि दादागिरी करणाऱ्यांना आम्ही धडा शिकवणार आहोत असं म्हणत रोहित पवार यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. Rohit Pawar

अजित पवार रॉकी भाई

यावेळी आपल्या भाषणात रोहित पवारांनी अजित दादांना केजीएफ चित्रपटातील रॉकी भाईची उपमा दिली. “KGF चित्रपटामध्ये जसं एक गरुडा आहे तो सर्व मायनिंगवर ज्या प्रकारे आपलं नियंत्रण ठेवतो तसं या शहरातील दोन गरुडा हे सगळीकडे आपलं नियंत्रण ठेवत आहेत. ते प्रत्येक टेंडरमध्ये रिंग करतात आणि पैसे खातात. या दोन्ही गरुडांना असं वाटतं हे त्यांचं साम्राज्य आहे. त्यावेळी रॉकी हा हिरो सर्वसामान्य जनतेला जसं गुंडागर्दीच्या दहशतीतून बाहेर काढतो, त्याप्रमाणे अजित पवार हे देखील रॉकीप्रमाणे या शहराला आणि जनतेला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर काढतील असा विश्वास रोहित पवारांनी व्यक्त केला.