वास्तुशास्त्रानुसार, योग्य पद्धतीनं केलेली अंघोळ शरीर आणि मन दोन्ही शुद्ध ठेवते. अनेक ठिकाणी तर अंघोळीच्या पाण्यात काही गोष्टी मिसळल्या जातात. यामुळे मनात सकारात्मक ऊर्जा वाढते. कोणत्या आहेत त्या गोष्टी? याबद्दल जाणून घेऊयात…
अंघोळीच्या पाण्यात कोणत्या गोष्टी मिसळाव्या
वास्तुशास्त्रानुसार, अंघोळीच्या पाण्यात हळद, मीठ, कच्चं दूध, गंगाजल, गुलाबजल आणि काही औषधी वनस्पती टाकल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते, आरोग्य सुधारते, नकारात्मकता दूर होते, धनलाभ होतो आणि मानसिक शांती मिळते, असे मानले जाते. हळद आरोग्य आणि शुद्धतेसाठी, मीठ नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्यासाठी, दूध शुद्ध करण्यासाठी आणि इतर वस्तू ग्रहदोष निवारणासाठी वापरल्या जातात. यांसारख्या गोष्टी मिसळल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मकता वाढते, मानसिक शांतता मिळते, आळस दूर होतो व लक्ष्मीची कृपा राहते, असे मानले जाते.
काळं मीठ
वास्तुशास्त्रानुसार, अंघोळीच्या पाण्यात काळं मीठ मिसळल्याने नकारात्मक ऊर्जा शोषून घेते,आळस दूर करते, वाईट नजर आणि ताण दूर करते, ज्यामुळे मन प्रसन्न होते आणि अडलेली कामे होतात.
गंगाजल
हिंदू धर्मात गंगाजलाला अत्यंत पवित्र मानलं गेलं आहे. वास्तुशास्त्रानुसार, अंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळल्याने मन शांत होते, नकारात्मक विचार दूर होतात आणि स्नान शुद्ध होते असे मानले जाते. गंगाजल शुद्धीकरणासाठी आणि आध्यात्मिक उर्जेसाठी वापरले जाते.
तुळशीची पानं
तुळशीची पाने मानसिक ताण कमी करतात, मन शांत ठेवतात आणि सकारात्मक ऊर्जा वाढवतात.
कडुनिंबाची पानं
वास्तुशास्त्रात कडुनिंबाला अत्यंत शुद्ध मानलं गेलं आहे. वास्तुशास्त्रानुसार, कडुलिंबाची पाने त्वचेसाठी आरोग्यदायी असून घरात सकारात्मक ऊर्जा आणतात आणि नकारात्मक ऊर्जा दूर करतात.
हळद
आरोग्य आणि शुद्धतेसाठी वापरली जाते, ज्यामुळे घरात सकारात्मकता आणि देवी लक्ष्मीची कृपा राहते.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)





