MP Breaking News
Sun, Dec 21, 2025

तो मी नव्हेच! कोर्टात वाल्मिक कराडने संतोष देशमुखांच्या हत्येशी संबंध नाकाराले, काय घडलं कोर्टात?

Written by:Astha Sutar
Published:
खटल्यातील कागदपत्रे कराड याला देण्यात येणार आहेत की नाही याचा निर्णय पुढील सुनावणीला होण्याची शक्यता आहे. याविषयी उज्वल निकम यांनी सांगितले की, कराड याने केलेल्या अर्जावर न्यायलायने सीआयडीला आपले म्हणणे मांडण्यास सांगितले आहे.
तो मी नव्हेच! कोर्टात वाल्मिक कराडने संतोष देशमुखांच्या हत्येशी संबंध नाकाराले, काय घडलं कोर्टात?

बीड : संतोष देशमुख हत्या प्रकरणीचा सुनावणी कोर्टासमोर आहे. या प्रकरणातील मुख्य आरोप वाल्मिक कराड याने आपल्या या हत्येशी तसेच खंडणीशी काही संबंध नसून आपण निर्देष असल्याचे न्यायालया सांगितले आहे. माझा या प्रकरणाशी काहीच संबंध नाही असे म्हणणाऱ्या वाल्मिक काराडने आपल्याला निर्देष मुक्त करावे यासाठी न्यायालयात अर्ज देखील केला. न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर सरकारी वकील उज्वल निकम यांनी याविषयी माहिती दिली आहे.

उज्वल निकम म्हणाले, आज सुनावणी दरम्यान वाल्मिक कराडने खटल्याच्या संदर्भातील कागदपत्रांची मागणी अर्जद्वारे न्यायालयाकडे केली आहे. जी कागदपत्रे सीआयडीमार्फत आम्ही न्यायालयात जमा केली आहेत तीच कागदपत्रे तो मागत आहे. काही महत्वाचे दस्तऐवज सीलबंद असल्याने ते सील बंद उघडल्यानंतर त्याच्या प्रती कराडला देण्यात याव्यात अशी विनंती आम्ही केली. दरम्यान कराडला कागदपत्रांची प्रति दिल्यानंतर त्या बाहेर यायला नको. त्याविषयी काळजी घेतलेली बरी असे देखील उज्वल निकम म्हणाले.

कराडच्या वकिलांचा काय युक्तिवाद

वाल्मिक कराडच्या वकिलाने वाल्मिक कराडविषयी कुठलाही प्राथमिक पुरावा नाही तसेच त्याचा खून, खंडणी प्रकरणाशी काहीच संबंध नाही. त्यामुळे त्याला मुक्त करण्यात यावे. तसेच त्याला खटल्यातील कागदपत्रे उपलब्ध करून देण्यात यावी.

24 एप्रिलला पुढील सुनावणी

खटल्यातील कागदपत्रे कराड याला देण्यात येणार आहेत की नाही याचा निर्णय पुढील सुनावणीला होण्याची शक्यता आहे. याविषयी उज्वल निकम यांनी सांगितले की, कराड याने केलेल्या अर्जावर न्यायलायने सीआयडीला आपले म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. ते म्हणणे २४ तारखेला न्यायालयात मांडण्यात येणार आहे. त्यासुनाणी वेळी दोन्ही बाजुने युक्तिवाद होईल आणि त्याव योग्य निर्णय घेतला जाईल. त्यामुळे आत्ता पुढील सुनावणी 24 एप्रिलला होणार आहे.

20 वेळा फोन केला

संतोष देशमुख यांच्या हस्तेमध्ये त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी दिलेला जबाब समोर आली आहे. यामध्ये धनंजय यांनी तब्बल 20 वेळा आरोपींना फोन करून आपल्या भावाला सोडून देण्याची विनंती केली. आरोपींनी देखील आपण त्याला सोडून देतो आहोत, असे सांगितले. प्रत्यक्षात मात्र त्यांची आपल्या भावाची हत्या केल्याचे धनंजय यांनी जबाबात म्हटले आहे.