MP Breaking News
Thu, Dec 18, 2025

Lionel Messi In Mumbai : मेस्सीमुळे मुंबईतील वाहतुकीत बदल; आज हे रस्ते बंद

Published:
Last Updated:
मेस्सी सारखा महान खेळाडू वानखेडे स्टेडियम वर येणार असल्याने संपूर्ण परिसरात मुंबई पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील काही महत्त्वाच्या रस्त्यावर वाहतुकीत बदल पाहायला मिळतील. मुंबई पोलिसांनी याबाबत अधिसूचना जारी केली असेल मुंबईकरांनो प्रवास करताना आधी ही बातमी जाणून घ्या.
Lionel Messi In Mumbai : मेस्सीमुळे मुंबईतील वाहतुकीत बदल; आज हे रस्ते बंद

Lionel Messi In Mumbai : फुटबॉल विश्वातील महान खेळाडू लिओनेल मेस्सी सध्या भारत दौऱ्यावर आहे. कोलकाता आणि हैदराबाद नंतर आज मेस्सी मुंबईत येणार आहे. मुंबईकर मोठ्या उत्साहाने मेस्सीची एक झलक पाहण्यासाठी आतुर झाले आहेत. मेस्सी सारखा महान खेळाडू वानखेडे स्टेडियम वर येणार असल्याने संपूर्ण परिसरात मुंबई पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील काही महत्त्वाच्या रस्त्यावर वाहतुकीत बदल पाहायला मिळतील. मुंबई पोलिसांनी याबाबत अधिसूचना जारी केली असेल मुंबईकरांनो प्रवास करताना आधी ही बातमी जाणून घ्या.

सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचे आवाहन

आज रस्त्यावरील गर्दी कमी करण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी जनतेला लोकल ट्रेन आणि मेट्रोसारख्या सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याची विनंती केली आहे. मेस्सी चाहत्यांच्या मोठ्या संख्येमुळे शहरातील अनेक प्रमुख मार्गांवर रस्ते वळवणे आणि पार्किंग निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

पार्किंग आणि रस्ते निर्बंध (Lionel Messi In Mumbai)

आज वानखेडे आणि ब्रेबॉर्न स्टेडियमभोवती पार्किंगला परवानगी दिली जाणार नाही. खालील रस्त्यांवर पार्किंग निर्बंध देखील लागू असतील:

सी रोड, डी रोड, ई रोड, एफ रोड, जी रोड एनएस रोड (दोन्ही दिशांना)

वीर नरिमन रोड, दिनशॉ वाचा रोड आणि जमशेदजी टाटा रोड
वीर नरिमन रोड आणि दिनशॉ वाचा रोडवर पे-अँड-पार्क सुविधा देखील तात्पुरत्या बंद करण्यात येतील. Lionel Messi In Mumbai

वाहतूक बदल आणि एकेरी नियम:

अनेक रस्त्यांवर एकेरी वाहतूक नियम लागू केले जातील:

डी रोड: एनएस रोडपासून ई अँड सी रोड जंक्शनपर्यंत पश्चिमेकडून पूर्वेकडे एकेरी वाहतूक.
ई रोड: डी रोड ते सी रोड जंक्शन पर्यंत दक्षिण दिशेने एकेरी वाहतूक.
वीर नरिमन रोड (दक्षिण दिशा): चर्चगेट जंक्शन ते ई रोड पर्यंत प्रतिबंधित प्रवेश.

कोस्टल रोडवरही परिणाम:

चंद्र बोस रोड (उत्तर): नेताजी सुभाष एअर इंडिया जंक्शन ते मफतलाल जंक्शन.
कोस्टल रोड (दक्षिण): वरळी/तार्डेओ ते मरीन ड्राइव्ह.
कोस्टल रोड (उत्तर): मरीन ड्राइव्ह ते वरळी/तार्डेओ.