Maha Vikas Aghadi : मुंबई महापालिकेच्या तोंडावर उद्धव ठाकरेंना आत्तापर्यंतचा सर्वात मोठा झटका बसला आहे. महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसने मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय जाहीर केला. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी मुंबईत पार पडलेल्या पक्षाच्या बैठकीनंतर याबाबतची घोषणा केली. चेन्निथला यांच्या या घोषणेमुळे महाविकास आघाडीतील फुटीवर शिक्कामोर्तब झालं आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेस आमच्या सोबत नाही हे संजय राऊत यांचे भाकीत आज खर ठरलं.
राज ठाकरेंमुळे माविआत बिघाडी (Maha Vikas Aghadi)
राज ठाकरेंमुळे काँग्रेसनं मुंबईत स्वबळाचा नारा दिला आहे. मुंबईत काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडली आहे. स्वबळावर लढणं कार्यकर्त्यांची इच्छा होती. ‘कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन निर्णय घेतल्याचे चेन्निथला यांनी स्पष्ट केले. आम्ही भाजप विरोधात आणि शिवसेना ठाकरे गटाविरोधात लढण्याचा निर्णय घेतला आहे. या लढाईत सच्चे देशभक्त आणि धर्मनिरपेक्ष लोकांनी आमच्यासोबत यावे. . मुंबईत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. मुंबईचा हवा तसा विकास झालेला आहे. त्यामुळे आम्ही स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे आमच्या हातात सत्ता आल्यानंतर आम्ही मुंबई महापालिकेचा कारभार चांगल्या पद्धतीने सांभाळू असे आश्वासन चेन्नीथला यांनी दिले. Maha Vikas Aghadi
उद्धव ठाकरेना धक्का
काँग्रेसची स्वबळाची घोषणा म्हणजे उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे. एकीकडे कोणत्याही परिस्थितीत मुंबईत महायुतीचा महापौर बसवायचाच यासाठी भाजप आणि शिंदे गट जोरदार तयारी करत आहे. दोघांमध्ये जागा वाटपाच्या चर्चाही अंतिम टप्प्यात आल्या आहेत. महायुतीमध्ये सगळं काही ओके अशी परिस्थिती असताना दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये मात्र खळबळ उडाली आहे. काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडल्याने उद्धव ठाकरे चेकमेट होण्याची शक्यता आहे. यामागचं कारण म्हणजे गतवर्षी पार पडलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सोबत असल्याने मुंबईतील मुस्लिम आणि दलित मतदार उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभा राहिला होता आता काँग्रेस स्वबळावर लढल्यास हा मतदार ठाकरेंपासून दुरावण्याची शक्यता आहे. साहजिकच काँग्रेस शिवाय निवडणूक लढायला लागल्यास लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपेक्षा महापालिकेत ठाकरेंना कमी मतदान होऊ शकतं.





