दीप अमावस्या म्हणजेच दिव्यांची अमावस्या या अमावस्येला दर्श अमावस्या असे देखील म्हणतात. तसेच ही अमावस्या आषाढ महिन्यात येत असल्याने हिला आषाढी अमावस्या देखील म्हणतात. आज आपण दीप अमावस्येचे काही शुभेच्छा संदेश पाहणार आहोत. हे मेसेजेस तुम्ही आपल्या मित्रमैत्रिणींना तसेच नातेवाईक व प्रियजनांना पाठवू शकता.
दीप अमावस्या
आषाढ महिन्यातील अमावस्या ही दीप अमावस्या म्हणून ओळखली जाते. यालाच दर्श अमावस्या किंवा आखाड अमावस्याही म्हटल जाते. यादिवशी दिव्याची पूजा केली जाते. दिवे हे मांगल्य आणि शुभ कार्याच प्रतिक मानलं जातं. धर्मशास्त्रानुसार यादिवशी कणकेचे दिवे लावून घरातील दिव्यांची पूजा केली जाते.
दीप अमावस्येचा प्रियजनांना द्या खास मराठीतून शुभेच्छा
दीप अमावस्येच्या दिवशी
तुमच्या आयुष्यातील अंधकार
मिटुदे…
जीवनात आनंदाचा प्रकाश
पडुदे
दीप अमावस्येच्या सर्वांना शुभेच्छा…!
दीप अमावस्येचे दीपपूजन
पितृदेवतांच्या आशीर्वादाने
वाढावे तुमचे अर्थार्जन
दीप अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा …!
सुख समृद्धीचा दिवा
जीवनातील तुमच्या अंधकार
दीपपूजनाच्या दिनी दूर व्हावा
दीप अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा…!
तिळाचे तेल कापसाची वात |
दिवा जळो मध्यान्हरात |
दिवा लावला देवांपाशी |
उजेड पडला तुळशीपाशीं |
माझा नमस्कार सर्व देवांपाशी
दीप अमावस्येच्या सर्वांना शुभेच्छा…!
चंद्रसूर्याचा तेजस्वी प्रकाशाने
उजळतील सर्व दिशा,
सुखाची नवी उमेद जागवेल
दर्श दीप अमावस्या हार्दिक शुभेच्छा…!
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)





