Ganesh Chaturthi 2025: देशभरात गणेश चतुर्थीची धामधूम दिसून येत आहे. देशभरात गणेश चतुर्थी साजरी केली जाते. परंतु महाराष्ट्रात गणेश चतुर्थी विशेष साजरी केली जाते. महाराष्ट्रात गणेश चुतर्थीची जय्यत तयारी सुरु आहे. गणपती बाप्पाच्या आगमनासाठी सर्वच उत्सुक आहेत. घराच्या सजावटीपासून ते बाप्पाच्या प्रसादापर्यंत सर्वच गोष्टींची तयारी होत आहे.
हिंदू धर्मात श्रीगणेशाला प्रथम देवता समजले जाते. कोणत्याही कार्याची सुरुवात बाप्पाच्या पूजेने केली जाते. त्यामुळे गणेश चतुर्थीलासुद्धा विशेष महत्व आहे. गणेश चतुर्थीला बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी आणि बाप्पाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी भक्त सर्व प्रयत्न करत असतात. शास्त्रामध्येसुद्धा बाप्पाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी काही खास गोष्टी सांगण्यात आल्या आहेत.
गणेश चतुर्थीमध्ये गणपती बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी विधीनुसार पूजा केली जाते. बाप्पाच्या आवडीचे पदार्थ नैवेद्य म्हणून बनवले जातात. बाप्पाला सुंदर डेकोरेशन करून विराजमान केले जाते. या सर्व गोष्टी अगदी भक्तिभावाने केल्या जातात. शास्त्रानुसार, गणेश चतुर्थीमध्ये बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी या गोष्टी तर करायलाच हव्यात शिवाय आणखी काही देवी-देवतांची पूजा करणेदेखील आवश्यक आहे. आज आपण त्याबाबतच जाणून घेऊया.
गणेश चतुर्थीला पंचदेवांची पूजा करा-
धार्मिक मान्यतेनुसार, गणेश चतुर्थीला पंचदेवांची पूजा करणे अत्यंत चांगले असते. पंचदेवांमध्ये श्रीगणेशासोबत देव महादेव, माता गौरी, विष्णुदेव आणि सूर्यदेवदेखील असतात. शास्त्रानुसार गणेश चतुर्थीमध्ये या देवी-देवतांचे आशीर्वाद मिळवणेसुद्धा आवश्यक असते. असे केल्याने घरातील सर्व अडचणी दूर होतात. घरामध्ये सुखसमृद्धी आणि आर्थिक भरभराटी येते.
यंदा गणेश चतुर्थी कधी आहे?
नुकताच श्रावण महिना संपला. आता गणपती बाप्पाच्या आगमनाची सर्वांना उत्सुकता लागून आहे. हिंदू पंचांगानुसार, भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चौथ्या तिथीला श्रीगणेशाची प्रतिष्ठापना केली जाते. यंदा २७ ऑगस्टला गणरायाचे आगमन होणार आहे. घरोघरी बाप्पा विराजमान होणार आहेत. त्यामुळे बाप्पाच्या स्वागताची जोरदार तयारी सुरु आहे.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)





