MP Breaking News
Wed, Dec 17, 2025

Putrada Ekadashi 2025 : चुकून एकादशीचा उपवास मोडला तर काय कराल? प्रायश्चित्त करण्याची पद्धत आणि पुजेचे उपाय

Written by:Smita Gangurde
Published:
हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, पापांपासून मुक्ती मिळविण्यासाठी अनेक पर्याय देण्यात आले आहेत. एकादशीचा उपवास मोडला तर प्रायश्चित्तासाठी तुम्ही काय करू शकता?
Putrada Ekadashi 2025 : चुकून एकादशीचा उपवास मोडला तर काय कराल? प्रायश्चित्त करण्याची पद्धत आणि पुजेचे उपाय

सनातन परंपरेत एकादशीचा उपवास भगवान श्री विष्णूची कृपादृष्टी वाढवणारा आहे. हा उपवास श्रावण महिन्याच्या शुक्लपक्षात येतो. याला पुत्रदा एकादशीही म्हटलं जातं. हिंदू मान्यतेनुसार, हा उपवास श्रद्धा आणि विश्वासासह ठेवावा. याशिवाय यादरम्यानचे विधी, दुसऱ्या दिवसाटा पारण केल्या संतानप्राप्तीचं सुख मिळू शकतं. याशिवाय तुमच्या इच्छाही पूर्ण होतात.

पुत्रदा एकादशीचा उपवास केल्याने भगवान हरिसह धनाची देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. म्हणूनच प्रत्येकजण सौभाग्याची कामना करण्यासाठी योग्य विधींसह हे व्रत करतात. पण जर चुकून एकादशीचे व्रत मोडले तर काय करावे? त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

क्षमा प्रार्थना…

हिंदू धर्मानुसार, जे व्रत केल्याने व्यक्तीला संतान सुख, सौभाग्य, आरोग्य आणि दीर्घायु प्राप्त होतं, तो उपवास चुकून मोडला तर काय कराल? अशावेळी व्यक्तीने तातडीने आंघोळ करून श्री विष्णूकडे क्षमा याचना करायला हवी. हिंदू मान्यतेनुसार, जर एखादी व्यक्ती पवित्र आणि निर्मळ मनाने श्री हरिसमोर आलल्या चुकांची किंवा पापांची क्षमा मागत असेल तर भगवान विष्णू त्यांना माफ करतो.

मंत्र-जप…

सनातन परंपरेत, पूजा किंवा उपवास इत्यादींमध्ये कोणत्याही चुकांसाठी काही मंत्रांचा उल्लेख करण्यात आला आहे. उपवास मोडला तर किंवा तुमच्याकडून उपवासाशी संबंधित काही चूक झाली असेल, तर तुम्ही विशेषतः श्री हरींसमोर हात जोडून या मंत्राचा जप करावा.

आवाहनं न जानामि न जानामि तवार्चनम्. पूजां श्चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर.
मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वरं. यत्पूजितं मया देव परिपूर्ण तदस्मतु.

दान करा…

हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, पापांपासून मुक्ती मिळविण्यासाठी अनेक पर्याय देण्यात आले आहेत. एकादशीचा उपवास मोडला तर प्रायश्चित्तासाठी तुम्ही गरजूंना मदत करू शकता. उपवास करताना झालेल्या चुकांबद्दल पश्चात्ताप करण्यासाठी आणि मनःशांतीसाठी श्री हरीचा ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ मंत्राचा जास्तीत जास्त जप करा. याशिवाय चुकून तुमचा उपवास मोडला असेल तर निराश होऊ नका आणि पुढच्या एकादशीचा उपवास विधी-व्रतातून पुन्हा करण्याचा संकल्प करा.याशिवाय व्रत पुढे कायम ठेवत दुसऱ्या दिवशी विधीनुसार पारण करावे.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)