बहुतांश जणांना स्वप्न पडत असता. मात्र स्वप्न का येतात, याचा अर्थ काय आहे असा तुम्ही कधी विचार केला आहे का? स्वप्न शास्त्रानुसार, (dream science) स्वप्ने लोकांच्या जगण्यातील महत्त्वाचा भाग आहे. कधी कधी चांगली तर कधी कधी खूप भयंकर आणि भीतीदायक स्वप्ने पडतात. अनेकदा स्वप्ने भविष्यात येणाऱ्या गोष्टींकडे इशारा करीत असतात. काही शुभ स्वप्ने दिसल्याने व्यक्तीचं आयुष्य सुखमय होतं, तर काही स्वप्ने जगण्यातील काही भयंकर घटनांकडे इशारा करतात.
शतकानुशतके लोक स्वप्नांना भविष्याचे संकेत, मानसिक अवस्थांचे प्रतिबिंब आणि आध्यात्मिक अनुभवांचे माध्यम मानत आले आहेत. स्वप्ने आपल्या वैयक्तिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावतात.
१० अशुभ स्वप्ने आणि त्यांचे संकेत….
१ जर एखाद्या व्यक्तीला रात्रीच्या वेळी स्वप्नात बैलगाडी दिसत असेल तर जीवनातील क्रिया मंदावण्याकडे इशारा देते. हे स्वप्न भविष्यात अयशस्वी होण्याकडे इशारा करतं.
२ स्वप्नात काळे ढग पाहणे म्हणजे दुखाचे संकेत. स्वप्न शास्त्रानुसार, काळे ढग दिसणे म्हणजे लवकरच तुमच्या आयुष्यात अडचणी येऊ शकतात.
३ स्वप्नात काळा कावळा पाहणं शुभ मानलं जात नाही. काळा कावळा हा कोणत्या तरी अपघाताचे संकेत देतो. असं स्वप्नात दिसल्याने एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूची बातमी कानावर येऊ शकते.
४ जर स्वप्नात काळे कपडे घातलेली व्यक्ती किंवा वस्तू दिसली म्हणजे यातून गंभीर आजाराचे संकेत मिळतात.
५ स्वप्नात रक्त वाहताना किंवा रक्तस्त्राव दिसणं म्हणजे दीर्घ आजाराचे संकेत.
६ जर स्वप्नात एखादी हिंस्त्र प्राणी तुमचा पाठलाग करीत असेल तर हा अशुभ संकेत असतो. यातून व्यक्तीला मोठी आर्थिक हानी होण्याचा इशारा मानला जातो.
७ स्वप्नात जर एखादी व्यक्ती वादळ, किंवा घर कोसळल्याचे स्वप्न पडले तर काळी सावली त्या व्यक्तीच्या मागे लागते असं मानलं जातं.
८ स्वप्नात चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहण दिसणं अशुभ मानलं जातं.
९ स्वप्नात एखादी व्यक्ती पक्षांना उडताना पाहत असेल तर स्वप्न शास्त्रानुसार, त्या व्यक्तीला आर्थिक नुकसान सहन करावं लागू शकतं.
१० जेव्हा एखाद्या व्यक्तीला स्वप्नात मोठा आवाज ऐकू येतो तेव्हा त्या व्यक्तीच्या घरात कौटुंबिक कलहाचं लक्षण मानलं जातं.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)





