MP Breaking News
Wed, Dec 17, 2025

Dhurandhar Movie : धुरंधर ट्रेंडवर अंकिताचा रोखठोक सवाल : “देशासाठी मरमर करणारे गुप्तहेर, आणि आपण त्यावर….

Published:
अंकिता म्हणाली की स्पाय म्हणजे फक्त चित्रपटातील अॅक्शन किंवा रोमांच नसतो. एका वेगळ्या देशात खोट्या नावाने राहताना त्यांचे आयुष्य सतत धोक्यात असते.
Dhurandhar Movie : धुरंधर ट्रेंडवर अंकिताचा रोखठोक सवाल : “देशासाठी मरमर करणारे गुप्तहेर, आणि आपण त्यावर….

Dhurandhar Movie : धुरंधर चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर या चित्रपटाभोवती सोशल मीडियावर आणि प्रेक्षकांमध्ये मोठी चर्चा सुरू आहे. रणवीर सिंहचा अभिनय, देशभक्तीचा विषय, आणि भारत-पाकिस्तान हेर संघर्षाची पार्श्वभूमी यामुळे चित्रपटाने अल्पावधीत मोठा गवगवा मिळवला आहे. काही दिवसांपासून इंस्टाग्रामवर आणि इतर डिजिटल प्लॅटफॉर्मवर ‘Day 1 as a Spy in Pakistan’ हा ट्रेंड मोठ्या प्रमाणावर फिरताना दिसत आहे. कंटेंट क्रिएटर्स विनोदी व्हिडीओ, मेम्स आणि रील्स बनवत या विषयावर मनोरंजन करत आहेत. मात्र या मनोरंजनाच्या लाटेत काहीजण हेरगिरीसारख्या गंभीर विषयाची थट्टा होत असल्याची टीका करीत आहेत. या ट्रेंडवर प्रतिक्रिया देतानाच सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावलकर हिने आपल्या व्हिडिओ पोस्टमधून या विषयाची गंभीरता मांडली.

काय म्हणाली अंकिता?

अंकिता म्हणाली की स्पाय म्हणजे फक्त चित्रपटातील अॅक्शन किंवा रोमांच नसतो. एका वेगळ्या देशात खोट्या नावाने राहताना त्यांचे आयुष्य सतत धोक्यात असते. त्यांच्या एका चुकीमुळे देशभरातील सुरक्षा धोक्यात येऊ शकते. ते कुटुंबापासून तुटलेले असतात, कोणालाही आपली खरी ओळख सांगू शकत नाहीत. त्यामुळे या पाश्र्वभूमीवर एखाद्या ट्रेंडसाठी त्यांची खिल्ली उडवणं किंवा विनोद करणं योग्य नाही. Dhurandhar Movie

तिने रवींद्र कौशिक यांच्या जीवनाचा उल्लेख करत लोकांना हेरांच्या त्यागाची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला. रवींद्र कौशिक हे भारताचे सुप्रसिद्ध गुप्तहेर होते, ज्यांनी पाकिस्तानमध्ये लष्करी पदापर्यंत पोहोचून देशासाठी अमूल्य माहिती पुरवली होती. त्यांना ब्लॅक टायगर हे नाव भारत सरकारकडून देण्यात आले होते. तथापि, त्यांच्या त्यागाची शौर्यकथा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलेली नाही. अंकिता म्हणते की आज जग प्रसिद्धी आणि क्रेडिटवर चालत असलं तरी या हेरांना कधीच प्रकाशझोतात येण्याची संधी मिळत नाही.

सोशल मीडियावरील या ट्रेंडवर थांबून विचार करण्याची वेळ आली आहे, असं ती सुचवते. फक्त मनोरंजनासाठी कोणत्याही विषयाचा वापर करणं योग्य नसतं. एखाद्याच्या त्यागाची किंमत समजून घेतल्यावरच आपण त्या गोष्टीबद्दल बोलायला हवं. धुरंधर चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची वेगळीच प्रतिक्रिया आहे. अनेकांनी या चित्रपटाला जबरदस्त प्रतिसाद देत सोशल मीडियावर समीक्षणं लिहायला सुरुवात केली आहे. यातील अॅक्शन, कथानकाची बांधणी आणि हेरगिरीचा रोमांच यावर लोक चर्चा करत आहेत. इतकंच नव्हे तर विरोध करणाऱ्यांना उत्तर देताना काहीजण शाब्दिक चकमक करत आहेत.

चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची चर्चा (Dhurandhar Movie)

चित्रपटाच्या यशानंतर दुसऱ्या भागाची चर्चा रंगू लागली आहे. मात्र या चर्चेपलीकडे अंकिताने उचललेला विषय गंभीर प्रश्न उपस्थित करतो. सोशल मीडियाच्या दुनियेत ट्रेंडला महत्व देत असताना आपण संवेदनशील विषयांशी कसा वागायला हवं याचा विचार या प्रकरणाने पुन्हा समोर आला आहे. धुरंधर चित्रपटामुळे केवळ मनोरंजनच घडत नाही, तर प्रेक्षकांच्या मनात देशभक्ती, संघर्ष आणि देशासाठी जीव धोक्यात घालणाऱ्या हेरांच्या जीवनाबद्दल नवे प्रश्नही निर्माण होत आहेत.