MP Breaking News
Sat, Dec 20, 2025

Rahul Deshpande Divorce : ‘एक नवीन अध्याय…’ लग्नाच्या १७ वर्षानंतर राहुल देशपांडेचा मोठा निर्णय

Written by:Smita Gangurde
Published:
आपल्या सुरेल स्वरांनी चाहत्यांच्या मनावर राज्य करणारा गायक राहुल देशपांडे याने त्याच्या लग्नाबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
Rahul Deshpande Divorce : ‘एक नवीन अध्याय…’ लग्नाच्या १७ वर्षानंतर राहुल देशपांडेचा मोठा निर्णय

आपल्या सुरेल स्वरांनी चाहत्यांच्या मनावर राज्य करणारा गायक राहुल देशपांडे याने त्याच्या लग्नाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. लग्नाच्या १७ वर्गांनंतर राहुलने वेगळं होत असल्याची माहिती चाहत्यांना दिली. यासाठी त्याने एक सोशल मिडिया पोस्ट चाहत्यांसोबत शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने मोठा खुलासा केला आहे.

राहुल देशपांडेंचा घटस्फोट…l Rahul Deshpande Divorce

राहुल देशपांडे हा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. आपल्या आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय तो सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करीत असतो, आज २ सप्टेंबर रोजी त्याने घटस्फोटाबाबतची पोस्ट शेअर केली आहे.


राहुल देशपांडे याची सोशल मिडिया पोस्ट

राहुलने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे, प्रिय मित्रांनो, तुम्ही सर्वजण माझ्या आयुष्यात महत्त्वाचा भाग राहीला आहात. यासाठी तुमच्यासोबत मी एक खासगी गोष्ट शेअर करीत आहे. काहीजणांसोबत मी आधीच ही गोष्ट शेअर केली आहे. लग्नाच्या १७ वर्षांनंतर असंख्य आठवणीनंतर, नेहा आणी मी एकमेकांच्या संमतीने वेगळं झालो आहोत. सप्टेंबर २०२४ मध्येच आमचं कायदेशीर वेगळं होणं पूर्ण झालं. खासगीरित्या सर्व कायदेशीर गोष्टी पूर्ण झाल्यानंतर ही बाब मी तुमच्यासोबत शेअर करीत आहे. आमची मुलगी रेणुकाचे हित ही आमची प्रायोरिटी आहे. शिवाय मी नेहाचाही प्रेमाने सांभाळ करेल, तिला सपोर्ट करेन. पालक म्हणून आमचं नातं अजूनही कायम असल्याचं राहुलने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.