रक्षाबंधन, भाऊ आणि बहिणीचं नातं सांगणारा आणि प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. श्रावणात येत असलेल्या अनेक सणांमध्ये रक्षाबंधन या सणाचा समावेश होतो. भाऊ आणि बहिणींना एकत्र येऊन एकमेकांची विचारपूस करण्याचा हा दिवस. हजारो वर्षांपासून असलेल्या हिंदू परंपरेत रक्षाबंधनाच्या सणाचं मोठं महत्त्व आहे.
रक्षाबंधनामागे काय आहे विज्ञान?
जी राखी बहीण भावाला बांधते त्यामागेही शास्त्र असल्याचं सांगण्यात येतं. राखीमध्ये रेशम वापरण्यात येतं. रेशमासह तांदूळ, दुर्वा, केसर, चंदन आणि मोहरीचा वापर करण्यात येतो. यामुळे वात आणि कफाचा त्रास होत नाही. चंदन शांत असल्यानं मेंदू स्थिर राहतो. ही राखी बराच काळ हातात ठेवायची असल्यानं प्रगतीसाठी या गोष्टी सहाय्यभूत ठरतात.
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देताना पाठवा खास संदेश…
१ आभाळाची साथ आहे,अंधाराची रात आहे,
मी कधीच कशाला घाबरत नाही कारण
माझ्या पाठीवर माझ्या भावाचा हात आहे!
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!
२ बहिणीचं प्रेम हे अथांग समुद्रासारखं,
निखळ असं नातं आयुष्यभर जपण्याचं,
बंधन नसतं कुठलं त्यात निर्मळ हास्याचं…
सोन्याहून सुंदर असं जगात आहे अनमोल,
नातं असं हे आपुलकीचं…
भाऊ बहिणीच्या प्रेमाचं…
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!
३ कुठल्याच नात्यात नसेल एवढी ओढ आहे, बहिणीचं हे नातं खूप खूप गोड आहे.
रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा…!
४ कुठल्याच नात्यात नसेल एवढी ओढ आहे, बहिणीचं हे नातं खूप खूप गोड आहे रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा…!
5 तू नेहमीच मला सुपरहिरोसारखे वाचवले आहेस. राखीच्या शुभेच्छा, माझी कायमची ढाल!
6 प्रिय बहिणी, तू माझा अभिमान आहेस, माझा आनंद आहेस, माझे सर्वस्व आहेस. रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!
7 आपण कितीही दूर असलो तरी, तू नेहमीच माझ्या हृदयाच्या जवळ असशील. राखीच्या शुभेच्छा!
8 तू आहेस माझ्या जीवनातला सर्वात मोठा आधार, रक्षाबंधनाच्या दिवशी तुला शुभेच्छा देताना मला आनंद होतोय. प्रेमाने तुझी बहीण.”
9 तुझी राखी मी नेहमीच सांभाळून ठेवेन, कारण त्यातच आहे आपल्या नात्याची ओळख. रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!”
10 “कितीही भांडलो तरी तुझ्या शिवाय माझे जीवन अपूर्ण आहे. तू आहेस माझा सर्वात मोठा मित्र आणि आधार. रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा, भाऊ!”





