MP Breaking News
Sat, Dec 20, 2025

कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर पुणे जिल्ह्यातील 63 धोकादायक पुल पाडले जाणार; जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

Written by:Rohit Shinde
Published:
मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे झालेल्या उड्डाणपूल दुर्घटनेनंतर आता पुणे जिल्ह्यातील सर्व उड्डाणपूलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आता 63 पूल पाडले जाणार आहेत.
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर पुणे जिल्ह्यातील 63 धोकादायक पुल पाडले जाणार; जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

पुणे जिल्ह्यातील कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर प्रशासन खडबडून जागे झाले होते.  मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे झालेल्या उड्डाणपूल दुर्घटनेनंतर आता पुणे जिल्ह्यातील सर्व उड्डाणपूलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील एकूण 627 उड्डाणपूलांचे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण करण्यात आले आहे. यानंतर समोर येणाऱ्या माहितीनूसार जिल्ह्यातील काही पूल आता पाडले जाणार आहेत.

जिल्ह्यातील 63 पूल पाडले जाणार!

णे जिल्ह्यातील सर्व उड्डाणपूलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील एकूण 627 उड्डाणपूलांचे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण करण्यात आले आहे. 63 उड्डाणपूल अत्यंत धोकादायक स्थितीत आढळले असून हे सर्व पूल पाडण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिली. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही तडजोड न करता हा निर्णय घेण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

80 पेक्षा अधिक उड्डाणपूलांमध्ये डागडूजी व दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे.जिल्हा प्रशासनाने सर्व संबंधित विभागांना आवश्यक निधीची तरतूद, यंत्रणा आणि मनुष्यबळ याबाबत योग्य ती तयारी ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.या संपूर्ण प्रक्रियेमुळे पुणे जिल्ह्यातील रस्ते आणि पुलांची सुरक्षितता वाढण्यास मदत होणार असून अशा दुर्घटनांना रोखण्याची दिशा निर्माण होईल अशी अपेक्षा प्रशासनाने व्यक्त केली आहे.

नेमकी काय दुर्घटना घडली ?

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरील कुंडमळा पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर 50 हून अधिक पर्यटक जखमी झाले. ही घटना रविवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि पोलीस दलाच्या मदतीने तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. या दुर्घटनेनंतर ही घटना नेमकी कशी आणि कशामुळे घडली, याचे कारण समोर आले होते. पूल जूना झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर मृतांच्या नातेवाईकांनी प्रत्येकी 5 लाखांची मदत देखील घोषित करण्यात आली होती. तसेच जखमींवरील उपाचाराचा खर्च देखील शासनाने केला होता.