MP Breaking News
Sun, Dec 21, 2025

“एकनाथ खडसेंचे अनेक महिलांसोबत अनैतिक संबंध”; भाजप आमदाराच्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ, नेमके प्रकरण काय?

Written by:Rohit Shinde
Published:
एकनाथ खडसे यांच्याविरोधात भाजप आमदारांनी एकत्रीत येत जळगावमध्ये पत्रकार परिषद घेतली, या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना आमदार मंगेश चव्हाण यांनी एकनाथ खडसे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
“एकनाथ खडसेंचे अनेक महिलांसोबत अनैतिक संबंध”; भाजप आमदाराच्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ, नेमके प्रकरण काय?

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी अनेकदा भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीका करत गंभीर आरोप केले. या दोन्ही नेत्यांमध्ये अनेकदा तुफान शाब्दीक युध्द रंगल्याचे अनेकदा पाहिले. कित्येकदा टोकाचे आरोपही केले गेले. त्यानंतर आता एकनाथ खडसे यांच्याविरोधात भाजप आमदारांनी एकत्रीत येत जळगावमध्ये पत्रकार परिषद घेतली, आणि खडसेंवर आता गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

पत्रकार परिषदेतून खडसेंवर आरोपांची राळ

जळगावातील या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना आमदार मंगेश चव्हाण यांनी एकनाथ खडसे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. चव्हाण यांच्या या आरोपांनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. मंगेश चव्हाण म्हणतात की, ” माझा खडसेंना सवाल आहे आणि माझं आपल्याला सांगणं आहे. तुमच्याच मतदारसंघातील एका व्यक्तीने माला काही गोष्टी सांगितल्या, त्याची जर मी जाहीर वाच्यता केली तर आपल्याला बाहेर तोंड काढायला जागा राहणार नाही. मी त्या व्यक्तीला तुमच्यासमोर जाहीर पत्रकार परिषदेमध्ये देखील आणतो. त्याने मला असं सांगितलं की एकनाथ खडसे हे अतिशय खालच्या स्तराचा विचार करणारे नेते आहेत. पुढे तो असं म्हणाला मी त्यांना अतिशय जवळून पहातो. वीस वर्षांच्या यांच्या इतिहासात यांनी अनेक लोकांना संपवलं. जवळच्या लोकांना यांनी संपवलं, यांनी राजकारणात तर हे केलच, परंतु यांनी अनेक महिलांशी अनैतिक संबंध ठेवले, मी हे जबाबदारीनं तुम्हाला सांगतो आहे.” मंगेश चव्हाणांनी खडसेंचे अनेक महिलांशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला आहे.

एकनाथ खडसेंचे महिलांशी अनैतिक संबंध?

मंगेश चव्हाणांनी केलेल्या आरोपानुसार ” एकनाथ खडसे यांचे अनेक महिलांशी संबंध होते. त्या महिला रात्र-रात्र यांच्याकडे येऊ राहायच्या, सकाळी लोकं त्यांना सोडायला जायचे, असा बघणारा व्यक्ती सांगत होता,” असं मंगेश चव्हाण यांनी म्हटलं आहे. दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की,  “मी मुक्ताईनगरमध्ये येतो, जाहीरपणे दोघे पत्रकार परिषद घेऊन एकमेकांसमोर येऊन बोलू, गिरीश महाजन यांच्यापेक्षा मी विकासाच्या बाबतीत सरस आहे, असं जर तुम्ही सिद्ध करून दाखवलं तर मी तुमचा सत्कार करायला मुक्ताईनगरमध्ये येईल.” असं जाहीर आव्हान या पत्रकार परिषदेत मंगेश चव्हाण यांनी एकनाथ खडसे यांना दिलं आहे.

थोडक्यात भाजपाचे राज्यातील ज्येष्ठ नेते गिरीष महाजनांची पाठराखण करताना आमदार मंगेश चव्हाणांनी एकनाथ खडसेंना थेट अंगावर घेतले आहे. आता आगामी काळात उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणातील हा वाद आणखी विकोपाला जाण्याची चिन्हे आहेत. मंगेश चव्हाणांनी केलेल्या आरोपांना आता एकनाथ खडसे काय उत्तर देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.