MP Breaking News
Wed, Dec 17, 2025

आनंदाची बातमी! लाडक्या बहिणींच्या खात्यात मे महिन्याचा हप्ता आजपासून येणार, मंत्री अदिती तटकरेंची माहिती

Written by:Astha Sutar
Published:
सरकार अधिक सतर्क झाले असून, राज्याच्या वित्त विभागाकडून केंद्रीय अर्थमंत्रालयाला प्रस्ताव पाठवण्यात येणार असून, लाडक्या बहिणींच्या आर्थिक वार्षिक उत्पन्नाची माहिती मागविण्यात येणार असल्याचेही माहिती समोर येत आहे.
आनंदाची बातमी! लाडक्या बहिणींच्या खात्यात मे महिन्याचा हप्ता आजपासून येणार, मंत्री अदिती तटकरेंची माहिती

Ladki Bahin Yojana – विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली होती. या योजनेला महाराष्ट्रात अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. किंबहुना या योजनेमुळेच महायुतीची सत्ता आली आहे, असंही बोलले जाते. दरम्यान, मागील जुलै २०१४ पासून दीड हजार प्रमाणे नऊ हप्त्याचे सरकारने लाडक्या बहिणीच्या खाता जमा केले आहेत. मात्र जून महिना आला तरी मे महिन्याचा हप्ता न आल्यामुळे लाडक्या बहिणी मे महिन्याच्या हप्ता कधी येणार? असा उपस्थित करत होत्या. मात्र यावर आता एक मोठी आणि महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

आजपासून खात्यात पैसे जमा होणार…

दरम्यान, जून महिन्याची पाच तारीख आली तरी मे महिन्याचा हप्त्याकडे लाडक्या बहिणी आस लावून बसल्या होत्या. सरकारकडे लाडक्या बहिणी या योजनेत निधी देण्यास पैसे नसल्याचे बोलले जात आहे. नऊ लाख कोटीचे सरकारवर कर्ज आहे. राज्याच्या तिजोरीत खडखडाट असताना अन्य विभागातील निधीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकडे वर्ग करण्यात आला होता. त्यामुळे या योजनेतील पैसे मिळणार ही नाही, याबाबत लाडक्या बहिणीमध्ये शासंकता होती. परंतु आजपासून म्हणजे ५ जूनपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे यायला सुरुवात होईल, अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.

अजून अर्जाची पडताळणी होणार…

दुसरीकडे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आल्यापासून या योजनेत गैरमार्गाने बोगस अर्ज दाखल करून अनेकांनी लाभ घेतल्याचे निदर्शनास आलेय. त्यामुळे सरकार अधिक सतर्क झाले असून, जे योजनेच्या निकषात बसत नाहीत. अशा लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात येत आहे. आतापर्यंत एकूण ११ लाख लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आले आहे. तर काही दिवसांपूर्वी 2000 पेक्षा अधिक शासकीय महिलांनी ही या योजनेचा लाभ घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. त्यामुळे सरकार अधिक सतर्क झाले असून, राज्याच्या वित्त विभागाकडून केंद्रीय अर्थमंत्रालयाला प्रस्ताव पाठवण्यात येणार असून, लाडक्या बहिणींच्या आर्थिक वार्षिक उत्पन्नाची माहिती मागविण्यात येणार असल्याचेही माहिती समोर येत आहे.