Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांना मिळणार ही महत्वाची खाती; अर्थखात्याचे कसं कसं??

Published:
सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्रीपदासोबत कोणती खाती मिळणार, याबाबतही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदासह अर्थ, उत्पादन शुल्क आणि क्रीडा खाते होती. मात्र आता अर्थ खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतःकडे ठेवण्याची शक्यता आहे
Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांना मिळणार ही महत्वाची खाती; अर्थखात्याचे कसं कसं??

Sunetra Pawar : राज्याच्या राजकारणात आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आता त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी येऊन पडली आहे. आज संध्याकाळी ठीक ५ वाजता सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असून, त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरणार आहेत.

कोणकोणती खाती मिळणार (Sunetra Pawar)

शपथविधीपूर्वी दुपारी २ वाजता विधानभवनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड केली जाणार असून, त्यानंतर त्यांच्या उपमुख्यमंत्रीपदावर शिक्कामोर्तब होणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेससह राज्याच्या राजकारणात मोठी हालचाल पाहायला मिळत आहे. दरम्यान, सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्रीपदासोबत कोणती खाती मिळणार, याबाबतही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदासह अर्थ, उत्पादन शुल्क आणि क्रीडा खाते होती. मात्र आता अर्थ खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतःकडे ठेवण्याची शक्यता आहे. राज्याचा अर्थसंकल्प तोंडावर असताना, अर्थ खात्याचा मोठा अनुभव असल्यामुळे फडणवीस हेच अर्थमंत्री राहणार असल्याचं बोललं जात आहे. तर क्रीडा खाते आणि उत्पादन शुल्क विभागाची जबाबदारी सुनेत्रा पवारांकडे दिली जाण्याची दाट शक्यता आहे. Sunetra Pawar

शरद पवारांची प्रतिक्रिया चर्चेत

या सगळ्या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मात्र थेट आणि स्पष्ट भूमिका मांडली आहे. सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत विचारणा केली असता शरद पवार म्हणाले, “सुनेत्रा पवार यांच्यासोबत माझी कोणतीही चर्चा झाली नाही. आज शपथविधी आहे, हे देखील मला माहिती नव्हतं. हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत निर्णय आहे. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे त्यांच्या पक्षाचे प्रमुख नेते असून, निर्णय घेण्याचा अधिकार त्यांचाच असल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं.