MP Breaking News
Wed, Dec 17, 2025

Market Price: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि सोयाबीनच्या दराची काय स्थिती? एका क्लिकवर दर जाणून घ्या !

Written by:Rohit Shinde
Published:
महाराष्ट्रातील बाजार समित्यांमध्ये कांदा आणि सोयाबीनची आवक सातत्याने कमी जास्त होत आहे. त्यामुळे दरामध्ये सध्या राज्यभर कमालीची अस्थिरता पाहायला मिळत आहे.
Market Price: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि सोयाबीनच्या दराची काय स्थिती? एका क्लिकवर दर जाणून घ्या !

महाराष्ट्रातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये सध्या कांदा आणि सोयाबीनच्या दरामध्ये कमालीची अस्थिरता पाहायला मिळत आहे. बुधवार, 17 डिसेंबर 2025 रोजी राज्यातील बाजार समित्यांमध्ये दराची एकूण काय स्थिती राहिली, त्याबाबत सविस्तर जाणून घेऊ…

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा

राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक चांगलीच कमी होताना दिसत आहे. याचा फायदा आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. कारण, दरांमध्ये वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खरंतर एकीकडे राज्यामध्ये कांद्याच्या मागणीत वाढ जरी झाली असली तरी दुसरीकडे आवक देखील कमी होत आहे. परिणाम कांद्याच्या दरामध्ये कोणतीही मोठी घसरण होताना दिसत नाही. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या काहीसा दिलासा मिळताना दिसत आहे.
मंगळवारी संध्याकाळ पर्यंत राज्यातील कृषी बाजारांमध्ये कांद्याची एकूण आवक 1 लाख 25 हजार 292 क्विंटल इतकी झाली आहे. यामध्ये सोलापूर बाजारात लाल कांद्याची सर्वाधिक 26 हजार 105 क्विंटल आवक नोंदविण्यात आली. सोलापूर बाजारात कांद्याला 1000 रुपये ते 3500 रुपये प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला. तर दुसरीकडे कोल्हापूर कृषी बाजारात आलेल्या 4728 क्विंटल कांद्यास कमाल 4000 रुपये प्रतिक्विंटल असा सर्वाधिक भाव मिळाला. सोमवारी मिळालेला कांद्याचा उच्चांकी दर मंगळवारी कायम राहिला असून, इतर बाजारांमध्ये मात्र दरात घसरण झाल्याचे चित्र आहे.

सोयाबीनच्या दरात मोठी घसरण

राज्यातील कृषी मार्केटमध्ये काल संध्याकाळपर्यंत सोयाबीनची एकूण आवक 55 हजार 551 क्विंटल इतकी झाली आहे. सोयाबीनची सर्वाधिक आवक लातूर कृषी बाजारात झाली असून, लातूर बाजारात दाखल झालेल्या 17 हजार 050 क्विंटल सोयाबीनला 3840 ते 4585 रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला. वाशिम कृषी बाजारात आलेल्या 3900 क्विंटल सोयाबीनला 5463 रुपये प्रतिक्विंटल असा सर्वाधिक दर मिळाला. मात्र, सोमवारी नोंदविण्यात आलेल्या उच्चांकी दराच्या तुलनेत मंगळवारी सोयाबीनच्या भावात घसरण झाल्याचे दिसून येत आहे.