MP Breaking News
Wed, Dec 17, 2025

येत्या नवरात्र उत्सवात तुळजापूर विकास प्रकल्पाचे भूमिपूजन, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

Written by:Astha Sutar
Published:
Last Updated:
संकेतस्थळावरील विकास आराखड्याच्या संकल्प चित्रातून ही प्रतिमा काढून टाकण्यात यावी, तसेच शिल्प तयार करताना पुरातत्व विभाग, इतिहास तज्ञ व अनुषंगिक घटकांशी चर्चा करून देवीची प्रतिमा कशी असावी याबाबत निर्णय घेण्याचे निर्देश सरनाईकांनी दिले.
येत्या नवरात्र उत्सवात तुळजापूर विकास प्रकल्पाचे भूमिपूजन, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

Pratap Sarnaik : महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेली कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिराबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. श्री क्षेत्र तुळजापूर येथील कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिर परिसराच्या विकास प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवाराच्या उपस्थितीमध्ये करण्याचा मानस असून, हा प्रकल्प पुढील २-३ वर्षात पूर्ण करण्यासाठी सरकार कटीबद्ध असल्याचे धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

१८६५ कोटी रुपयांचा तुळजापूर विकास आराखडा

दरम्यान, देशभरातून दरवर्षी सुमारे १ ते १.५ कोटी भाविक श्रीक्षेत्र तुळजापूरला भेट देत असतात. त्यांना भविष्यात चांगल्या सुख- सुविधा मिळाव्यात तसेच तुळजापूर शहराचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने १८६५ कोटी रुपये खर्चाचा तुळजापूर विकास आराखडा बनवला. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठां पैकी श्री. तुळजाभवानी देवी, तुळजापूर हे पूर्ण शक्तिपीठ आहे. तसेच आई तुळजाभवानी क्षात्रतेजाची स्फूर्ती देवता, प्रेरणाशक्ती व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे कुलस्वामिनी आहे. असं सरनाईक म्हणाले.

आराखड्यांतर्गत १०८ फुटाचे शिल्प…

हा प्रकल्प गतीने मार्गी लागण्यासाठी भूसंपादन, तांत्रिक मान्यता आणि विविध निविदा प्रक्रिया या तिन्ही गोष्टी गतीने कराव्यात, या प्रकल्पामध्ये तुळजाभवानी मंदिर परिसर आणि संपूर्ण शहराचा सर्वांगीण विकास करण्याच्या सर्व गोष्टी अंतर्भूत करण्यात आलेले आहेत. श्री क्षेत्र तुळजापूर विकास आराखड्यांतर्गत १०८ फुटाचे शिल्प उभारले जाणार आहे. या शिल्पामध्ये श्री. तुळजाभवानी माता छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देत असल्याचे दाखवण्यात आले आहे. परंतु हे दाखवत असताना श्री. तुळजाभवानी मातेची प्रतिमा ही अष्टभुजाकृती दाखवण्यात आलेली आहे, अशी माहिती मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितली.